बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या एक जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून 3.75 टक्के वाढविण्याचा निर्णय …
Read More »खानापूर समितीचे सोमवारपासून जनजागृती दौरे
उद्या नियोजनासंदर्भात बैठक खानापूर : तालुक्यात मराठी भाषिकांची एकजूट रहावी यासाठी सोमवारपासून जनजागृती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक दि. 7 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील हे …
Read More »खाजगी बसला आग; 11 प्रवासी ठार
नाशिक : औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात …
Read More »प्रभागात विकासकामांंना चालना देऊन “नारळ फोडणार” : सुचिता परीट
संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांना आश्वासनाच्या झुल्यावर झुलवत ठेवण्याचे काम आपण कदापी करणार नाही. नगरोथान योजनेतून निधी मिळवून विकास कामांना चालना देऊनच आपण विकास कामांचा नारळ फोडणार असल्याचे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका सौ. सुचिता श्रीकांत परीट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, प्रभाग १० मधील कोण-कोणती …
Read More »संकेश्वरात श्रीनिधी-जगदीश यांचे सहर्ष स्वागत
संकेश्वर (महंमद मोमीन) : सायकलवरून “निसर्ग वाचवा” चा संदेश घेऊन मंगळूर ते काश्मीर प्रवास दौऱ्यावर निघालेले सायकलपटू श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार यांचे संकेश्वरात हाॅटेल मालक संघ आणि वंदे मातरम् योग केंद्रातर्फे सुधाकर शेट्टी यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी बोलताना सुधाकर शेट्टी म्हणाले, श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार हे निसर्ग वाचवा, …
Read More »संकेश्वरातील स्केटिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकतीच खुली रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडली. त्याला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमी, शाखा संकेश्वरच्या वतीने खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर अकॅडमीच्या स्केटरनी स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचे उदघाटन हिरण्यकेशी साखर कारखान्याचे व्यवस्थापक …
Read More »मृतदेह आढळल्याने करोशी गावात खळबळ
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून सुनील साळुंके (रा. करोशी ता. चिक्कोडी) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत सुनील रविवारी पहाटे आईला कामावर जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर पाच दिवसानंतर आज शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर …
Read More »राधानगरी तालुक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार जाहीर
बेळगाव येथे उद्या शनिवारी माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण कोल्हापूर (आनिल पाटील) : राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर” गौरव पूरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व …
Read More »चंद्रे येथील बी. एस. पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर
बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल कोल्हापूर (आनिल पाटील) : चंद्रे (ता. राधानगरी जि. कोल्हापूर) येथील राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. पाटील (बळवंत सदाशिव पाटील) यांना बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल …
Read More »दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोड देऊ नये
राजू पोवार : जिल्हा पंचायत बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची शंभर किलो मिळणारी साखर रद्द करून केवळ ५० किलो साखर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. त्या संदर्भात वार्षिक सभेत प्रश्न विचारूनही अध्यक्षांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समांतर सभा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta