Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ पदवीने डाॅ. ऋचा चिकोडे सन्मानित

सीमाभागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी ही राखीव जागा ठेवणेची सीमावासीयाची मागणी निपाणी : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी घेतलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सीमाभागातील निपाणी नगरीची सुकन्या डॉ. ऋचा राजन चिकोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन M.S. (Obst and Gynae) मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ ही पदवी …

Read More »

भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व

  मुंबई : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलेय. तसेच भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी …

Read More »

“त्या” 22 शाळांना उद्या पुन्हा सुट्टी

बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शुक्रवारी दि. 12 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शुक्रवारी (१२ ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात आली …

Read More »

उत्तर प्रदेशात बोट उलटून 30 जण बुडाले; चौघांचे मृतदेह सापडले

उत्तर प्रदेशमधील बांदा येथे गुरुवारी दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी एक बोट बुडाली. बोटीत 30 हून अधिक लोक होते. यातील चार जण कसेतरी पोहत नदी काठी पोहचले. पोलीस प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. एसडीआरएफचेही पथक बुडालेल्या लोकांचा …

Read More »

टीएमसीच्या आणखी एका नेत्यावर घोटाळ्याचे आरोप, सीबीआयने केली अटक

  कोलकात्ता : प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी न्यायालयात टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना आज आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. सीबीआयने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी दिली आहे. टीएमसी नेत्याला प्राण्यांच्या तस्करीच्या एका प्रकरणात अटक …

Read More »

एसीबीची स्थापना उच्च न्यायालयाकडून रद्द

  लोकायुक्ताना प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार बंगळुरू : राज्य सरकारला मोठा झटका देत, उच्च न्यायालयाने लोकायुक्त पोलिस शाखेला लोक सेवकांवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार बहाल केले. राज्य सरकारला परत एक मोठा धक्का देताना, कर्नाटक उच्च न्यायालयाने 2016 चा लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी) स्थापन करण्याचा निर्णय रद्द केला. कर्नाटक लोकायुक्त कायदा, …

Read More »

माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल : पंकजा मुंडे

  मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात …

Read More »

गजकर्ण सौहार्दने सभासदांचं विश्वास संपादन केले : शिवानंद कमते

संकेश्वर (महंमद मोमीन) : गजकर्ण सौहार्द सहकारी संस्थेने सभासदांचे विश्वास संपादन केल्याचे चार्टर्ड अकाऊंटंट शिवानंद कमते यांनी सांगितले. ते गजकर्ण सौहार्द सहकारी संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोरगांवी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सुहासिनी बोरगांवी यांनी केले. अहवाल …

Read More »

निपाणी शहर आणि परिसरात रक्षाबंधन साजरा

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.10) दिवसभर येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती. गुरुवारी (ता.11) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील युवती व महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून …

Read More »

निपाणीत ’आरटीओ’ची धडक कारवाई

  वाहनधारकांनी घेतली धडकी : विविध कागदपत्रांची तपासणी निपाणी (वार्ता) : चिकोडी येथील प्रादेशिक वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी शहरात अचानकपणे गुरुवारी (ता. 11) सकाळपासून सर्वच चार चाकी वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आठवडी बाजारा दिवशी झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये धडकी भरली होती. अधिकार्‍यांनी विविध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कागदपत्रे नसलेला व …

Read More »