Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

जीएसटीच्या निषेधार्थ बेळगावात व्यापार्‍यांचा बंद

  बेळगाव : केंद्र सरकारने अन्नधान्य आणि डाळींवर 5% वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लादल्याचा निषेधार्थ बेळगावातील व्यापार्‍यांनी आज रविवारपेठसह बाजारपेठ बंद ठेवून हरताळ पाळला. आज बेळगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठेतील सर्व व्यापार्‍यांनी एक दिवस संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून जीएसटी लादल्याचा निषेध केला. अलीकडेच केंद्र सरकारने अन्नधान्य आणि डाळींवर …

Read More »

सौंदत्ती तालुक्यात विजेचा धक्का लागून दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू

  सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हिरूर गावात आज शनिवारी विजेचा धक्का लागून दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला. फकिराप्पा सिद्धप्पा चंदरगी (54) आणि महादेवा दुर्गाप्पा मैत्री (40) अशी मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. हे दोघेही ऊसाच्या शेतात काम करत असताना पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. सौंदत्ती पोलीस ठाण्याचे …

Read More »

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार मांडणार 24 विधेयक

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून 24 नवीन विधेयक सादर करण्यात येतील, अशी माहिती लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाकडून देण्यात आली. दि. मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीस (सुधारणा), विधेयक, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा) विधेयक, केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) विधेयक, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियोडिकल्स विधेयक-2022 सारख्या महत्वाच्या …

Read More »

तवंदी एसडीएमसी अध्यक्षपदी संतोष पाटील

  उपाध्यक्षपदी शामबाला पाटील : दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : कोणत्याही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो व तो निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व गावकरी मंडळींमधून एका व्यक्तीने सर्व कमिटी मेंबरला विश्वासात घेऊन शाळेची सुधारणा करण्यासाठी शाळा सुधारणा कमिटीची व्यवस्था शासनाने केलेली आहे. अशा तवंदी शाळेच्या शाळा …

Read More »

गुरुशिवाय जीवनात ध्येय गाठणे अशक्य

  प्राचार्य डॉ. शाह : देवचंदमध्ये गुरुपौर्णिमा साजरी निपाणी (वार्ता) : भारतीय परंपरेत गुरु – शिष्य नात्याला अनन्य साधारण महत्व आहे. शिष्याला आपले जीवन सुखी – समृद्ध बनवायचे असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणे आवश्यक आहे. गुरू शिवाय जीवनात इच्छित ध्येय गाठणे अशक्य आहे, असे मत प्राचार्य पी. पी. शाह …

Read More »

कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक …

Read More »

हिडकल डॅममध्ये युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात अज्ञात मारेकर्‍यांनी एका युवकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात राहणार्‍या परशुराम हलकर्णी नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. गावातील अंजनेय मंदिराजवळ काही हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या करून फरार …

Read More »

रेडक्रॉसकडून मराठा सेंटरला 57 हजार फेसमास्क

  बेळगाव : कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखेतर्फे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, जेएल विंग आणि मिलिटरी हॉस्पिटल यांना एकूण 57 हजार इम्पोर्टेड पुनर्वापर करता येणारे फेसमास्क आज देणगी दाखल देण्यात आले. भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव शाखेतील रेड क्रॉस राज्य व्यवस्थापन …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ

  मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राला नवीन मंत्रिमंडळ कधी मिळणार? याची प्रतिक्षा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही गटातील मंत्र्यांचा …

Read More »

राष्ट्रपती पदासाठी आपचा यशवंत सिन्हांना पाठिंबा जाहीर

  नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी (18 जुलै) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. अशात दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पाठिंबा विरोधी पक्षांना मिळाला आहे. ही विरोधकासाठी आनंदाची बातमी आली. …

Read More »