Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

सुनक यांचे कौतुक करणाऱ्या हिंदूत्ववाद्यांनी केली सोनियांची अवहेलना

बेळगाव : येथील प्रगतीशील लेखक संघातर्फे ‘ब्रिटनमधील राजकीय उलथापालथ’ या विषयावर बोलताना जागतिक घडामोडींचे अभ्यासक काॅ. अनिल आजगांवकर यांनी आर्थिक अंगाने ब्रिटनमधील सद्य परिस्थितीचे विस्तृत विश्लेषण केले. शहीद भगतसिंग सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर प्रा. आनंद मेणसे, काॅ. कृष्णा शहापूरकर आणि ऍड. नागेश सातेरी उपस्थित होते. आजगांवकर आपल्या …

Read More »

खानापूरात कर्नाटक राज्य रयत संघाच्यावतीने धरणे आंदोलनाची जनजागृती

  खानापूर (प्रतिनिधी) :खानापूर तालुक्यातील लोंढा, विभागात सोमवारी कर्नाटक राज्य रयत संघाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या धरणे सत्याग्रह जागृती मोहीम रविवारी पार पडली. यावेळी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना धरणे सत्याग्रहात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना राज्य रयत संघाचे उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ म्हणाले की, खानापूर तालुक्यातील संपूर्ण कायदा व सुव्यवस्था …

Read More »

ऐन दिवाळीतही स्वच्छतेचे कर्तव्य

पाच टन कचरा संकलन : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे योगदान निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात सलग पाच दिवसदिवाळीची धामधूम सुरू होती. त्यानिमित्ताने विविध प्रकारची खरेदी, लक्ष्मीचे पूजनसह विविध कार्यक्रम पार पडले. या काळात शहरात फटाक्याचे कागद व विविध प्रकारच्या पूजेचे साहित्य असा मोठा कचरा संकलित ही बाब लक्षात घेऊन नगरपालिका …

Read More »

सोमालिया दहशतवादी हल्ल्याने हादरले; 100 जण दगावले

  सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाले आहेत. सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत आतापर्यंत 300 लोक जखमी झाले आहेत. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी, 29 ऑक्टोबर रोजी दोन कार बॉम्बस्फोट …

Read More »

निर्णयाच्या आश्वासनामुळे सैदापूर येथील रयतचे आंदोलन मागे

  निर्णय होईपर्यंत कारखाना बंद : रयत संघटनेचा पुढाकार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन 5500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सैदापूर येथील गोदावरी साखर कारखान्याने हा दर द्यावा, या मागणीसाठी रयत …

Read More »

छठ पूजेदरम्यान भीषण घटना, 30 हून अधिक जळाले, अनेकांची प्रकृती चिंताजनक

  पटना : बिहारच्या औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरातील सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. दरम्यान या झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे 30 हून अधिक जण जळाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज पहाटे अडीचच्या सुमारास परिसरातील अनिल …

Read More »

कुन्नूरमध्ये अवतरली शिवसृष्टी!

किल्ले पाहण्यासाठी गर्दी; राजगड, रायगड, पन्हाळागड,भुईकोट, सिंधुदुर्गच्या प्रतिकृती : अनेक मंडळांचा सहभाग निपाणी (वार्ता) : दिवाळीनिमित्त यावर्षी कुन्नूरमध्ये स्वराज्य ग्रुप, धुडकुस ग्रुप, छत्रपती स्पोर्ट्स, शिवछत्रपती मंडळ, व्हीटीएम ग्रुपसह विविध मंडळांनी राजगड, रायगड, उदगीर- भुईकोट, सिंधुदुर्गसह इतर किल्ल्यांच्या मोठ्या प्रतिकृती हुबेहूब बनविल्या आहेत. किल्ल्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी गडप्रेमींची मोठी गर्दी होऊ लागली …

Read More »

खानापूर आदर्श नगरात नगरपंचायतीच्या वतीने कुपनलिकेची सोय

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्टेट बँकेजवळील आदर्श नगरात नगरपंचायतींच्या वतीने नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या प्रयत्नातून नवीन कूपनलिका खोदून पाण्याची सोय नुकताच करण्यात आली. यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या कार्याचे कौतुक केले. त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार …

Read More »

कुर्ली कुस्ती मैदान सांगलीच्या ठाकूरने जिंकले 

यात्रेनिमित्त आयोजन : लहान-मोठ्या पन्नास कुस्त्यांची मेजवानी, शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : श्रीक्षेत्र कुर्ली आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुर्ली येथील शिंत्रे आखाडा येथे पार पडलेल्या कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती सांगली येथील सुदेश ठाकूरने गुणांवर जिंकली. यावेळी लहान मोठ्या ५० कुस्त्या पार पडल्या. परतीच्या पावसामुळे हे कुस्ती मैदान लांबणीवर पडले …

Read More »

सहा पदरीकरणात जाणाऱ्या जमिनीचा सर्व्हे सुरू

  काही शेतकऱ्यांचा विरोध : व्यावसायिकांचा प्रश्न ऐरणीवर कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू झाले असून टोल नाका परिसरातील शेतकऱ्यांनी सहा पदरीकरण व्यतिरिक्त ज्यादा जाणाऱ्या जमिनीला विरोध दर्शवला आहे. येथील शेतकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यात बोलणी होऊन रुंदीकरणात जाणाऱ्या शेती जमिनीचा सर्व्हे करण्यात येत आहे. …

Read More »