Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीला निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये रात्रीची वस्तीसाठी एकही बस नाही. ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत आणि जास्तीत जास्त बस ह्या मिनी बस आहेत. त्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होते. गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायला ही जागा नसते. अशात काही …

Read More »

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित कर्णधार तर राहुल उपकर्णधार

नवी दिल्ली : आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. तर यंदाच्या आशिया कपसाठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे …

Read More »

संकेश्वरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत…

  सकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गेल्या तीन दिवसांपासून आश्लेषा (आसळकाचा) पाऊस संततधार बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले दिसत आहे. पावसाची दिवसरात्र संततधार चालू असल्याने सर्वसामान्य लोक, कष्टकरी शेतकरी, किरकोळ व्यापारी, फेरीवाले आर्थिक अडचणींचा सामना करताना दिसत आहेत. संततधार वृष्टीने शेतकऱ्यांच्या कामला ब्रेक मिळालेला दिसत आहे. गावातील बरेच रस्ते पावसाने …

Read More »

संकेश्वरात बुधवारी नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली गावातील सर्व २३ प्रभागातील प्रमुख मार्गे काढली जाणार असल्याचे मुख्याधिकारी आर सी चौगुला यांनी सांगितले. आज पालिका सभागृहात …

Read More »

मराठा मंदिरात भव्य शॉपिंग उत्सव 60 हून अधिक स्टाॅल्सचा सहभाग

  बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे 10 दिवस आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स …

Read More »

साचलेल्या पाण्यात जिल्हाधिकारी फिरले अनवाणी पायांनी!

  २४ तासांत मदतीची कार्यवाही : जिल्हाधिकारी नितेश पाटील बेळगाव : काल रात्रीपासून आज दिवसभरात बेळगाव शहर आणि परिसरात पावसाने जोर धरला आहे. रात्रीच्या पावसामुळे शहर आणि उपनगर भागातील अनेक नागरिक वसाहतींमध्ये घराघरात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाणी …

Read More »

सौंदलगा येथील कै. नागोजी मेस्त्री यांचे स्मरणार्थ दूध व बिस्किटे वाटप

  सौंदलगा : येथील मंडल पंचायतीचे माजी सदस्य व ग्रामपंचायत नामवंत कॉन्ट्रॅक्टर, काल कथित कै. नागोजी संतराम मेस्त्री यांचे २ जुलै २०२२ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नागपंचमी निमित्त, बसव पंचमी म्हणून या दिवशी दिनकर मेस्त्री, विक्रम मेस्त्री, कुमार मेस्त्री यांनी रचनावादी बालक-पालक स्कूलमध्ये पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात तिरंगा ध्वज वाटप

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात येणार्‍या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून महाशक्ती प्रमुख व नगरसेवकांना तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी बेळगांव उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कोडगनूर व सरचिटणीस श्री. विनोद लंगोटी, …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्याकडून श्रीनगर नाला व किल्ला तलावाची पाहणी

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर नाला व किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर येथील नाल्यांची चोकअप साफ करण्याच्या आणि सुरळीत पाण्याच्या प्रवाहासाठी राष्ट्रीय ध्वजाजवळील किल्ला तलाव स्वच्छ करा, अशा संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

Read More »