Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर पुजार्‍यांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. दर्शनाकरिता ते 100 ते 200 रुपये आकारत आहेत तसेच देवीचे थेट दर्शन घेण्याकरिता 500 रुपये आकारात आहेत. येथील देवीच्या दरबारात खुलेआम भाविकांची लुबाडवूक होत आहे. त्यामुळे आज येथील जय भीम ओम साई संघटनेच्या वतीनेयल्लमा देवीचा डोंगरावरती सुरू …

Read More »

संजय राऊत यांना तात्पुरता दिलासा, 14 दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीने स्वीकारली

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीने ही विनंती स्वीकारली आहे. त्यामुळे संजय राऊत चौकशीसाठी आता 14 दिवसांनी ईडी कार्यालयात हजर राहतील. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय …

Read More »

के. के. कोप्प येथे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ता कामाला चालना

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकासकामे विविध टप्प्यात राबविण्यात येत असल्याची माहिती आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प येथे 38 लाख रुपये खर्चातून काँक्रीट रस्ता कामाला भूमिपूजन करून चालना दिल्यानंतर त्या बोलत होत्या. आ. हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो …

Read More »

केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांची ऐतिहासिक ठिकाणांना भेट

बेळगाव : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी बेळगावातील विविध महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेतली. बेळगावातील किल्ला परिसरातील ऐतिहासिक कमलबस्ती, रामकृष्ण मिशन आश्रम आदी ठिकाणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी भेट देऊन माहिती घेतली. 3 दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर असलेल्या सोमप्रकाश यांनी सोमवारी सुवर्णसौधमध्ये …

Read More »

कोगनोळीच्या भाविकांनी घेतले नालंदा येथील महावीर मोक्ष भूमीचे दर्शन

कोगनोळी : येथील ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने सम्मेद शिखर्जी मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये एकशे तीस भाविकांचा समावेश असून सम्मेद शिखरजी येथील जैन मंदिराचे दर्शन घेऊन बिहार येथे असणार्‍या नालंदा पावापुरी येथील भगवान महावीरांच्या मोक्ष स्थळाचे दर्शन घेतले. कुरुंदवाड येथील प्रदीप मगदूम यांनी भगवान महावीर यांची …

Read More »

कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही : दीपक केसरकर

गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) लाईव्ह संवाद साधताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विखारी टीकेवर बोट ठेवले. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे सांगून गुवाहाटीतील कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही, असा दावा केसरकर यांनी यावेळी केला. लवकरात …

Read More »

जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदलीचा आदेश जारी

बेळगाव : दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर त्यात भर म्हणून आता विविध न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जारी करण्यात आलेल्या सदर आदेशानुसार बेळगाव द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पवनेश डी. यांची प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात बदली झाली आहे. तृतीय अतिरिक्त …

Read More »

कुप्पटगिरी पाणंद रस्ता होणे गरजेचे : प्रमोद कोचेरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावाला जोडणारा पाणंद रस्ता हा सर्वे नंबर १५/८ हा सरकारी पाणंद रस्ता म्हणून नोंद आहे. तेव्हा पाणंद रस्ता होणे अतिमहत्वाचे आहे. यासाठी तहसीलदार प्रविण जैन यांनी या पाणंद रस्त्याचा नकाशा करून द्यावा. या पाणंद रस्त्यावर कोणी तरी जेसीबी लावून कामाला अडथळा आणण्याचे कामे केले …

Read More »

खानापूर रूमेवाडीजवळील साई काॅलनीत रस्त्याची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या सुरूवातीलाच खानापूर रूमेवाडीजवळील करंबळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नविन वसाहतीतील साई काॅलनीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याची दखल घेऊन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा रस्त्यातुन शाळकरी लहान मुले तसेच वयोवृध्द नागरिकाना घरा …

Read More »

गोवावेस येथील ईएसआय क्लिनिकचे स्थलांतर; नोंद घेण्याचे आवाहन

बेळगाव : गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक बनल्याने तेथील ईएसआय क्लिनिक आता खाऊ कट्टा समोरील आदिशक्ती इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पुढील कांही वर्षे याच इमारतीत हे क्लिनिक सुरू राहणार असून ईएसआय संबंधित कामगारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात अशोकनगर येथे ईएसआयचे मुख्य …

Read More »