Sunday , July 26 2026
Breaking News

श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने

Spread the love

बेळगाव : बाजार गल्ली वडगाव येथील स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरात श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव दि. 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार
आहे.
श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. 7 ते 9 पर्यंत डोंबिवली (मुंबई) येथील प्रसिध्द कीर्तनकार हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने होणार आहेत.पित्रे यांचे कीर्तन सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मंदिरात रोज होईल. सौ. पित्रे यांची प्रथमच बेळगावात कीर्तने होणार आहेत. त्यांना तबलासाथ पखवाजपटू श्री. यशवंत बोंद्रे तर संवादिनीची साथ श्री. वामन वागुकर करणार आहेत.
किर्तनाचा कार्यक्रम सर्वांना खुला असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष भालचंद्र कृष्णा चौधरी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *