बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्य हादरवून सोडलेल्या कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. बरोबर ७ वर्षांपूर्वी २०१५मध्ये बेळगावातील कुवेम्पूनगरातील एका महिलेचा आणि तिच्या २ मुलांचा अनैतिक संबंधातून खून केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या …
Read More »“चला हवा येऊ द्या फेम” भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे 3 जुलै रोजी बेळगावात..
बेळगाव (प्रतिनिधी) : झी टीव्हीवर गाजत असलेल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील अभिनेते हास्यवीर भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे हे दोघेही दि. 3 जुलै रोजी बेळगावात येत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा राजू पवार डान्स …
Read More »फुलेवाडी -डुक्करवाडीत कुंभार कलाकारांना टेराकोटा म्युरल आर्ट्स शिबीराचा समारोप उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील फुलेवाडी-डुक्करवाडीत क्राॅफ्टस कौन्सिल ऑफ बेंगलोर यांच्यावतीने १५ दिवसाचे मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. त्याचा समारोप समारंभ बुधवारी दि. २२ रोजी आयोजित करण्यात आला. या १५ दिवसाच्या कुंभार कला शिबीरात उत्तम आधुनिक मातीपासून वेगवेगळ्या कलाकृती, वाल पीस, वेगवेगळ्या प्रकारचे पाॅडस् तयार करण्यात आले. या शिबीराला क्राफ्ट …
Read More »२० आमदार आमच्या संपर्कात : संजय राऊत यांचा दावा
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याबराेबर गुवाहाटीला गेलेले २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करत शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून शिंदे गटात आमदार का जात आहेत याचे सत्य लवकरच बाहेर येईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. बंडखाेर आमदारांनी पुन्हा निवडून …
Read More »शिंदेंच्या गटात ‘अब तक 46’, शिवसेनेची गळती काही थांबेना
गुवाहाटी : शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार …
Read More »पीडीओ बन्नी यांना जांबोटी गावाचा पाठिंबा : संजय गावडे
खानापूर : जांबोटी गावातील सामान्य जनतेचा कानोसा घेतला असता गावातील जनतेचा पाठींबा पीडीओ नागाप्पा बन्नी यांना आहे, असे संजय गावडे यांनी सांगितले. सध्या जांबोटी पंचायत पीडीओच्या विरूद्ध पंचायत सदस्यांनी आंदोलन छेडले आहे. परंतु गावातील सामान्य माणूस हा पीडीओच्या बाजूनी आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्ते व जांबोटी भागातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेले संजय …
Read More »अखेर, ग्रामीण मालमत्ता कर भरणा आता ऑनलाईन
बंगळूर : उशीरा, परंतु ग्रामीण नागरिकांचे जीवन सुकर करण्याचे आश्वासन देणार्या, बसवराज बोम्मई प्रशासनाने सुधारणा आणल्या आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांचा मालमत्ता कर आता ऑनलाइन भरता येतो. मालमत्ता कराचा भरणा एवढी वर्षे मॅन्युअल होता, त्यामुळे पैसे बुडवले गेले. बापूजी सेवा केंद्राच्या वेबसाइटवरून केवळ कर भरणेच नाही, तर इतर अनेक सेवा जसे …
Read More »जायन्ट्स प्राईड सहेली व मारवाडी युवा मंच यांच्यावतीने योग दिन साजरा
बेळगाव : जायन्ट्स प्राईड सहेली व मारवाडी युवा मंच आयोजित एक आठवड्याचे योगा शिबिर आज गजानन महाराज ध्यान मंदिरमध्ये संपन्न झाले या सात दिवसात योग प्रशिक्षक श्री. नईम शेख यांनी अनेक प्रकारचे योग शिकवले. सात दिवस रोज अग्निहोत्र होत होते. साऊंड हीलींगमुळे ताणतणाव कसे कमी होतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. शिबीर …
Read More »तयारी विधानसभेची…
संकेश्वर (महंमद मोमीन) : आजी-माजी मंत्री योग साधनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा लोकांतून केली जात आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथील एस.डी हायस्कूल मैदानावर आयोजित योग दिवस कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील सहभागी होऊन तासभर योग साधनेत तल्लीन होऊन गेलेले दिसले. विजयपूर येथे विद्यमान …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिवस कार्यक्रमाची सुरुवात राजेश कणगली, सौ. श्रीदेवी राजेश कणगली यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. योगशिक्षक परशुराम कुरबेटी, पुष्पराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta