Monday , September 21 2026
Breaking News

क्रेडाई शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : क्रेडाई बेळगाव संस्थेच्या शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वप्रथम बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजीव पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर त्यांना क्रेडाईच्या उपक्रमांची तसेच कोरोना काळात केलेल्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली.
त्याचप्रमाणे भविष्यातही क्रेडाई संस्था समाजाच्या मदतीसाठी कायम सज्ज रहा असेल असे सांगितले. चर्चेदरम्यान क्रेडाईच्या सदस्यांनी शहरातील रहदारीची समस्या, कॅम्प येथील बॅरिकेड्स वगैरे समस्यांची माहिती दिली.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सर्व माहिती जाणून घेऊ क्रेडाईबद्दल प्रशंसोउद्गार काढले तसेच भविष्यात अधिक उत्तम कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी क्रेडाई बेळगावचे विद्यमान अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्यासह माजी अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, अमर अकनोजी, सचिन कळ्ळीमनी, वृषभ हिरेमठ, आनंद तुडयेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *