खानापूर (सुहास पाटील याजकडून) : खानापूर तालुक्यात एकूण ५१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी ३८ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ३ एकर जमिनीत हा कचरा डेपोचे आयोजन करण्यात येणार आहे.यापैकी नंदगड ग्राम पंचायतीने कचरा डेपो कामाचा शुभारंभ केला असून याठिकाणच्या कचरा डेपोत गावातील प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाॅटल, कचरा असा वेगळा केला जातो. …
Read More »सेवानिवृत्तीनिमित्त बुवाजी व गुरव यांचा सत्कार
बेळगाव : हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कुल येथील मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तर बडकू गुरव हे ४४ वर्षांच्या प्रदीप सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्याबाबत त्यांचा शाळा सुधारणा कमिटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी बुवाजी व गुरव यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूरातून गुरव गल्ली व घाडी गल्लीतून पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य …
Read More »हाळ झुंजवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या धक्कादायक
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका प्रशासन कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही.त्यामुळे अशा कर्जबाजारीला शेतकरी कंटाळून आणि अनेक संकटाना त्रासुन गळफास घेणे, किटकनाशक प्राशन करणे, नदीत उडी मारून जीव देणे असे प्रकार घडतात. मात्र यामागचे कारण तालुका प्रशासन शोधुन …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूर मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूर मराठी पत्रकार संघटनेचा पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार सहकार्य …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमाला खानापूर वकील संघटनेचा पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित …
Read More »कणकुंबी भागातील ४५ वर्षावरील ९०% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस : आरोग्यधिकारी डॉ. बी. टी. चेतन
बेळगाव (वार्ता) : कोरोना काळात जनतेला वैद्यकीय सेवेसाठी विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र योग्य नियोजनाद्वारे कणकुंबी परिसरातील ३२ गावातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्याचे काम कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील ४५ वर्षावरील ९०% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. …
Read More »बंद असलेली पारवाड- खानापूर वस्ती बस पूर्ववत करण्याची मागणी
खानापूर (वार्ता) : पारवाड – खानापूर वस्ती बस गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे बंद करण्यात आल्यामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गांचे हाल होत आहेत. सदर बस त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे. खानापूर आगारातुन गेल्या अनेक वर्षापासून पारवाड -खानापूर अशी वस्ती बस सुरू करण्यात आल्यामुळे जांबोटी कणकुंबी भागातील …
Read More »अखेर खानापूर शहराचा पाणी पुरवठा पूर्वपदावर, नगरपंचायतीचे प्रयत्न
खानापूर (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून खानापूर शहराचा पाणीपुरवठा विद्युत मोटारीत बिघाड होऊन बंद पडल्यामुळे ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्याची वेळ शहरवासीयाना आली. त्यानंतर नगरपंचायतीने दुरूस्तीचे काम हाती घेतले व पाणीपुरवठा पूर्वपदावर आला. याबाबतची हकीकत अशी की,नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यासह शहराला पाणीच पाणी करून सोडले. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचा अधिकारग्रहण कार्यक्रम संपन्न
अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर सचिवपदी विजय बनसुर यांची फेरनिवड बेळगाव (वार्ता) : माझी संघटना माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने कार्य केले तर नक्कीच ती संघटना नावारूपाला येते. आज नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या संचालक मंडळींनी शपथ घेतली असून पुढील वर्षभर समाजाप्रती निष्ठा ठेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर व्हा, असा सल्ला जायंट्स फेडरेशनचे …
Read More »