Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

प्रदेश कॉंग्रेसतर्फे जोरदार ‘राजभवन चलो’ आंदोलन

नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बंगळूर : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची राजकीय सूड भावनेतून ईडीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप करून प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे राजभवन चलो आंदोलन हाती घेण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन रोखले. नॅशनल …

Read More »

ढोकेगाळी शाळेला खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट

खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी येथील मराठी शाळची इमारत कोसळली होती. याची माहिती अंजलीताईना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ग्रामस्थांच्या समस्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली. शाळेची पाहणी करून शाळेची कौले काढून मोडकळीस आलेल्या छताची डागडुजी करून नवीन पत्रे …

Read More »

मध्यवर्तीकडे धावा, ओळखा अनाजीपंताचा कावा!

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात “काय घडतय आणि काय बिघडतय” याची चाचपणी मध्यवर्ती करेल का? असा प्रश्न बेळगावच्या राजकारणात उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्रच इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक तर गुडघ्याला बाशिंग बांधून मीच ग्रामीणचा उमेदवार अश्या थाटात वावरताना दिसत आहेत. सध्या आयाराम तेजीत आहेत तर …

Read More »

27 जून रोजीच्या मोर्चासंदर्भात पोलीस कमिशनर यांच्याशी समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा

बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी नागरिकांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे व इतर साहित्य मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने 31 मार्च 2004 रोजी परिपत्रकही काढले आहे. परंतु काही कन्नड संघटनांच्या विरोधामुळे हे परिपत्रक मागे घेतले आहे. परिपत्रकात काही दुरुस्ती करण्याचे कारण देऊन मागे घेतलेले हे परिपत्रक अजून प्रसिद्धीस दिले …

Read More »

‘मला सोमवारपर्यंत वेळ द्या’, राहुल गांधींची ईडीला विनंती

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली आहे. तीन दिवसांत 30 तासांच्या चौकशीनंतर राहुलने आता ईडीकडून पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंत वेळ मागितला आहे. त्यांनी ईडीकडे एक दिवसाचा दिलासा मागितला आणि पुढील चौकशीसाठी सोमवारची वेळ द्यावी, असे सांगितले. असं असलं तरी ईडी …

Read More »

27 जून रोजीच्या मोर्चासंदर्भात खानापूर तालुका समितीतर्फे जनजागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चा संबंधित जनजागृतीची सुरुवात कसबा नंदगड येथून झाली. मोर्चा संबंधित जनजागृती करण्याची बैठक समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती पण कसबा नंदगड गावच्या नागरिकांच्या आग्रहाने कार्यक्रम मंडपामध्ये घेण्यात …

Read More »

जीवन विद्या मिशनतर्फे उद्या वैभव निंबाळकर यांचे व्याख्यान

बेळगाव : सदगुरू श्री वामनराव पै यांच्या संकल्पाचा एक भाग म्हणून जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचा मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंग मंदिरामध्ये सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात …

Read More »

संकेश्वर येथील बुरुड गल्लीत जोर लगाके हैसा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १० मधील बुरुड गल्लीतील गटार सांडपाण्याने तुंबून राहिल्याने प्रभागातील नागरिकांतून ओरड केली जात होती. त्याची दखल घेऊन आज गटार साफ करण्यासाठी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका सौ. सुचिता एस. परीट यांचे पती पिंटू परीट स्वतः पुढे सरसावलेले दिसले. पालिकेला गटार साफ करण्यास वारंवार …

Read More »

संकेश्वरातून महाराष्ट्र शासनाचा नामफलक हटविला

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता येथील बायपास ब्रिजजवळ महाराष्ट्र शासनाच्या गावांचा दिशादर्शक फलक झळकाविणेत आला होता. तो येथील कन्नड पर संघटनांच्या दृष्टीश पडताच आज सकाळी कन्नडपर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोर्चाने जाऊन फलक हटविण्याची जोरदार मागणी करत घोषणाबाजी केली. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती …

Read More »

संकेश्वर रस्ता अपघातात दुचाकीस्वार ठार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पुणे -बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरण्यकेशी ब्रिज जवळ कारने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार बाहुबली अप्पासाहेब देवण्णावर (वय ३६) राहणार निलजी तालुका गडहिंग्लज जागीच ठार झाला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी बाहुबली अप्पासाहेब देवण्णावर हा निलजी येथून मोटारसयकल क्रमांक एम.एच.09/ …

Read More »