बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावात मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलीच्या शाळेत पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले. विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या …
Read More »मानसिक अस्वास्थामुळे खानापूर भागात भटकत असलेल्या व्यक्तीला कुटुंबियांकडे स्वाधीन
खानापूर : परभणी जिल्ह्यातील एक इसम विमनस्क अवस्थेत खानापूर तालुक्यातील शिवठाण रेल्वे ट्रॅकच्या आसपास फिरत असताना रेल्वे किमेन विष्णू नाळकर यांना भेटला. त्यांच्याकडून तो थोडा वेळ बोलत राहिला पिण्यासाठी पाणी मागितले. विष्णू यांनी बोलता बोलता त्याला तू कुठून आलास इथे, काय करतोस असे विचारले असता आपण परभणी जिल्ह्याचा असल्याचे त्याने …
Read More »दोघा बंडखोर आमदारांना धजदची नोटीस; निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल संताप, धजदची बंगळूरात निदर्शने
बंगळूर : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल धजदने पक्षाच्या श्रीनिवास गौडा आणि गुब्बी श्रीनिवास या दोन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, धजदतर्फे रविवारी बंगळूरात निदर्शने करून कॉंग्रेस व भाजपच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. श्रीनिवास गौडा यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याची कबुली दिली होती, तर गुब्बीचे आमदार …
Read More »हेनरिक क्लासेनची वादळी खेळी, भारताचा सलग दुसरा पराभव!
कटक : हेनरिक क्लासेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताचा चार विकेट्सनं पराभव केला. भारतानं दिलेल्या 149 दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजुनं झुकवला. परंतु, त्यानंतर मैदनात आलेल्या हेनरिक …
Read More »प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने साने गुरुजी पुण्यतिथी साजरी
बेळगाव : महात्मा गांधींचे विचार पुढे नेणारे साने गुरुजी हे ज्येष्ठ विचारवंत आणि हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांचा पिंड शिक्षकाचा असला तरी ते एक उत्तम साहित्यिक, प्रभावी वक्ता, पत्रकार आणि संपादक तसेच उत्तम भाषांतरकार अश्या अनेक भूमिकेत साने गुरुजी वावरले, असे वक्तव्य स्तंभलेखक अनिल आजगांवकर यांनी काढले. प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने …
Read More »भाजपचं मिशन ‘राष्ट्रपती’, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी
नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. त्याशिवाय यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण …
Read More »धनंजय महाडिकांचा कोल्हापुरात पोहोचण्यापू्र्वीच बंटी पाटलांना अप्रत्यक्ष इशारा
कोल्हापूर : तब्बल आठ वर्षांनी विजयाची चव चाखलेल्या नुतन खासदार धनंजय महाडिक यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोल्हापुरात करण्यात आली आहे. त्यांची मिरवणूक अंबाबाई मंदिरात येऊन संपणार आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच कराडमध्येच धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे पालकमत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा …
Read More »राष्ट्रपती निवडणूक : संयुक्त उमेदवार देण्याबाबत सोनिया गांधी सकारात्मक
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर चर्चा केली. यानंतर त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत या निवडणुकीसाठीची पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सोनिया गांधी यांनी म्हटलं …
Read More »राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधकांत फूट? ममता बॅनर्जींच्या बैठकीवर इतर पक्ष नाराज असल्याची चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सुरुंग लागला असल्याची चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधकांची 15 जून रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी असल्याचे इतर पक्षांनी म्हटले. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta