Sunday , July 26 2026
Breaking News

प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : अनेक वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार्‍या तरुणीचा गळा आवळून खून करून आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनीत शुक्रवारी घडली.
राणी चन्नम्मा विद्यापीठात एमएचे शिक्षण घेणारा सौंदत्ती तालुक्यातील रामचंद्र बसप्पा तेनगी (29) आणि केएलई हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रेणुका केंचप्पा पंचन्नावर (30) यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण रेणुकाने रामचंद्र याला आपले प्रेमसंबंध विसरायला सांगितल्याने रागाच्या भरात रेणुकाचा रामचंद्रने खून करून स्वत: आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.
तरुणाने आत्महत्या केलेल्या नोंद सापडली असून एपीएमसी सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *