Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

मुकुंद परब यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली!

बेळगाव : विविध संस्थांचे संस्थापक व संचालक असलेले निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे ऍड. मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकले आहेत अशा शब्दात अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड. मुकुंद परब यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मुकुंद …

Read More »

येळ्ळूर महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी सुनावणी उद्या

बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवून मराठी जनतेवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी लोकांनीच हल्ला केल्याचा कांगावा केला. लोकांवर गुन्हे दाखल केले. या याचिकेवर आता बुधवारी(दि. ८) होणार आहे. २०१४ मध्ये पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आला. शांतता पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांवर अनामुष हल्ला करण्यात आला. त्यानंतर …

Read More »

हिंडलगा महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे उद्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या एप्रिल 2022 च्या दहावी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार दि. 8 जून रोजी दुपारी 2-00 वाजता येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंडलगा गावचे सुपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ …

Read More »

’कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही’, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानासाठी बाहेर पडण्याला ईडीचा विरोध

मुंबई : कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कसम 62 नुसार हा एक औपचारीक अधिकार आहे, त्यामुळे तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना ही …

Read More »

राज्यसभा-विधान परिषद निवडणुकीत आमचा विजय निश्चित : येडियुरप्पा

बेळगाव : वायव्य मतदार संघातील दोन्ही जागा आम्ही नक्की बहुमताने जिंकू, राज्यसभेतही लेहरसिंग यांच्यासह तिन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, आमच्यात कसलाही गोंधळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीची संपूर्ण जगाने प्रशंसा केली आहे. त्यांचा केवळ नावामुळेच आमचा विजय …

Read More »

12 जूनपासून गोव्यात दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन!’

यंदाच्या हिंदु अधिवेशनाचे वैशिष्ट्य- ‘हिंदु राष्ट्र संसद’! कोल्हापूर : गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या 10 व्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. …

Read More »

छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देणारे बाल महोत्सव : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (महंमद मोमीन) : छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देण्यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महोत्सव संयोजक डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित बाल महोत्सवात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रुक्मिणी गार्डन येथे आयोजित बाल महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. …

Read More »

ब्लूमिंग बड्स स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन

बेळगाव : ब्लूमिंग बड्स शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी 6 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि अर्थपूर्णपणे साजरा केला. प्रख्यात समाजसेविका आणि कोविड योद्धा सौ. माधुरी जाधव या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अनेक वर्षापासून सौ. माधुरी जाधव गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत. दि. ब्लूमिंग …

Read More »

तुळजाभवानीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर तुळजाभवानी गोंधळी समाजतर्फे गोंधळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष कृष्णा दवडते, परशराम शिसोदे, महेश दवडते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी प्राजक्ता हत्तळगे (93%), सुमित दवडते (86%), वैष्णवी सुगते (86%), प्रतिभा दवडते, मनिषा हत्तळगे (83%), दिव्या दवडते (75%) यांना शैक्षणिक …

Read More »

प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. 1974 ते अगदी 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते 64 …

Read More »