Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगावात बुस्टर डोस जिल्हास्तरीय लसीकरणाचा प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत प्रतिबंधात्मक बुस्टर डोस जिल्हास्तरीय लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, कोविड लसीकरण अमृत महोत्सवानिमित्त, सर्वांना मोफत बुस्टर डोस देण्याच्या जिल्हास्तरीय मोहिमेचा उद्घाटन समारंभ आज, सोमवारी एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व स्वामीजींच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड बुस्टर डोस देणे हा या मोहिमेचा हेतू असून बेळगाव जिल्ह्यात 30 लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करून बेळगाव जिल्हा राज्यात नंबर 1 बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसर्‍या डोसच्या लसीकरणामध्ये आम्ही चांगले यश प्राप्त केले आहे. ज्या लोकांनी कोविडमुळे होणारे मृत्यू आणि त्रास पाहिले आहेत त्यांना या लसीकरणाचे महत्त्व माहित असणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी म्हणाले, लोक लवकर काहीही गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा परिणाम आम्हाला जाणवला. तरीही प्रत्येकाला पुरेशी खबरदारी घेऊन लसीकरण करण्यात आले. त्यामुळे आता बुस्टर डोस देण्याचा सरकारचा उद्देश असून लोकांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार अनिल बेनके कार्यक्रमाला अनुपस्थित होते. विधान परिषद सदस्य डॉ. साबन्ना तळवार, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही., नगरसेवक रेखा हुगार, राजशेखर डोणी, लक्ष्मी महादेव राठोड, हनुमंत कोंगाली आदी मान्यवर व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Spread the love  मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव; राणी चन्नम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *