बेळगाव : येळ्ळूर येेथील सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजकुमार क. पाटील व व्हा. चेअरमन पदी श्री. सतीश बा. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सन्मित्रच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन् 2022-23 ते 2026-27 सालाकरिता पुढील 5 वर्षासाठी हा कार्यकाळ राहील, असे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …
Read More »शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे ‘आनंदमेळा’चे आयोजन
बेळगाव : नोव्हेंबर 18, 19 व 20 असे तीन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत रामनाथ मंगल कार्यालय, टिळकवाडी येथे खाद्य जत्रा/ ‘आनंद मेळा’चे आयोजन शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे केले जाणार आहे. विविध चटपटीत व रुचकर शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनपसंद कपड्यांच्या तसेच अनेक आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा …
Read More »खानापूरात भाजपसह तालुक्यात कनकदास जयंती उत्साहात साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विविध कार्यालयात तसेच तालुक्यात आणि खानापूर तालुका भाजप कार्यालयात शुक्रवारी दि. ११ रोजी कनकदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी येथील भाजपच्या तालुका कार्यालयात कनकदास जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. तर कार्यक्रमाला बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप युवा नेते …
Read More »निपाणी मतदारसंघात पानंद रस्त्यासाठी 46 कोटी रुपयांचे अनुदान
हंचिनाळ येथे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पानंद रस्त्याचा शुभारंभ हंचिनाळ : निपाणी विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानातून. 50 55 योजनेअंतर्गत 46 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यातून मतदारसंघात दर्जेदार पानंद रस्ते होणार असल्याचे प्रतिपादन चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. हंचिनाळ ता. निपाणी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या …
Read More »सांबरा येथे काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाला चालना
बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या सांबरा गावातील गणेश नगरात येणाऱ्या सर्व गल्ल्यांतील रस्त्यांच्या विकासाकरिता आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 50 रु. लाखांचे अनुदान मंजूर करून काँक्रीटचे रस्ते निर्मितीच्या कामाला चालना दिली आहे. आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सांबऱ्यात सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यापूर्वी 80 लाख रुपये मंजूर करून रस्त्यांची …
Read More »प्राईड सहेलीतर्फे अभय उद्यानाची स्वच्छता!
बेळगाव : सामाजिक कार्यात कायम अग्रस्थानी असलेल्या प्राईड सहलीच्या सदस्यांनी अभय उद्यान सराफ कॉलनी येथे भेट दिली. तेव्हा त्यांनी पाहिले खूप कचरा जमा झालेला आहे. झाडाची पाने गळून सगळीकडे पसरलेली आहेत. काही ठिकाणी झाडाची फळे पडून खराब झालेली होती. त्यांना मुंग्या लागलेल्या होत्या. या उद्यानाची नेहमीच स्वच्छता करण्यात येते. …
Read More »“गोल्डन स्क्वेअर”च्या बुद्धीबळपटूंची एससीएमए ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विशेष बाजी
बेळगाव (प्रतिनिधी) : धारवाड येथे नुकत्याच झालेल्या एससीएमए (SCMA) ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत एकूण 257 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला होता. स्पर्धेत बेळगाव बुद्धिबळ अकादमीने पहिला क्रमांक पटकाविला. अकादमीला पहिल्या क्रमांकाचे 4000 रुपयांचे रोख बक्षीस व …
Read More »खानापूरात काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचा भाजपकडून निषेध
खानापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाबाबत केलेले वादग्रस्त विधान संपूर्ण हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या. अशा वादग्रस्त विधानाचा खानापूरात शुक्रवारी निषेध करण्यात आला. यावेळी खानापूरातील लक्ष्मी मंदिरापासुन निषेध मोर्चा काढण्यात आला. खानापूर तालुका भाजप कार्यालयाच्या समोर निषेध मोर्चाने घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पणजी बेळगांव महामार्गावरील …
Read More »तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेत अज्ञात व्यक्तीची हत्या
हुबळी : तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात काल रात्री अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. तिरुपती – हुबळी रेल्वे रात्री उशिरा हुबळी येथील बहट्टी येथे आली असता, डब्यांचे निरीक्षण करताना एका व्यक्तीचा खून झाला असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती …
Read More »पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बंगळूरात उद्या भरगच्च कार्यक्रम
स्वागताची जय्यत तयारी, केंपेगौडांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळूर : बंगळूरचे संस्थापक केंपेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरमध्ये दाखल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उद्याननगरी सज्ज झाली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले असून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्याात आली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta