Sunday , July 26 2026
Breaking News

पीएफआय, सहयोगी संस्थांवरील बंदी योग्य; युएपीए लवाद

Spread the love

 

नवी दिल्ली : गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) बंदी घालण्यात आलेल्या कुख्यात पीएफआय संघटनेवरील बंदी योग्य असल्याचा निर्वाळा युएपीए लवादाकडून मंगळवारी देण्यात आला. केंद्र सरकारकडून एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले असल्याचा पीएफआयचा दावा देखील लवादाने फेटाळून लावला.

पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्था सामाजिक वीण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निरीक्षण लवादाने नोंदविले असल्याचे या प्रकरणाशी संबंधित वकिलांकडून सांगण्यात आले. पीएफआयच्या कारवायांशी संबंधित काही व्हिडिओ सरकारकडून लवादासमोर सादर करण्यात आले. तर शंभर लोकांची साक्षही नोंदविण्यात आली. पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्थांविरोधातील बंदी योग्य असल्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाला कळविण्यात आला असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *