Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

रयत गल्लीतील घराची भिंत कोसळली

बेळगाव : मुसळधार पावसाने रयत गल्ली मा.वडगाव येथील विधवा महिला निता विवेक डोंगरे यांच्या घरची भिंत रविवारी दुपारी कोसळल्याने घराचे छप्पर जमीनीवर पडले आहे. सुदैवाने त्या व त्यांची मुलं घरात नसतानां ही घटना घडल्याने अनर्थ टळला. या कुटुंबाला मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे

Read More »

राष्ट्रपतीसाठी एनडीएला तर उपराष्ट्रपतीसाठी यूपीएला पाठिंबा : संजय राऊत

  मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी (ता. १८) निवडणूक होणार आहे. एनडीएने आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर यूपीएने यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिवसेना मुर्मू आणि सिन्हा यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक घडामोडीनंतर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना …

Read More »

गोव्यात काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये, दिगंबर कामत यांची हकालपट्टी

  पणजी : माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका कामत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी …

Read More »

शाहुनगरात डेंग्यू व चिकुनगुनिया लसीकरण शिबीर

  बेळगाव : शाहुनगर, बेळगाव येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांच्यावतीने मोफत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. पाटील बिल्डिंग, शिवबसव मार्ग, शाहुनगर, बेळगाव येथे आज, रविवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांतर्फे मोफत डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण …

Read More »

पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा संपन्न

  बेळगाव : बेळगाव येथील एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या वतीने बेळगावातील प्रसिद्ध पुस्तकप्रेमी आणि पुस्तक संग्राहक शंकर चाफाडकर यांच्या पाचव्या स्मृतिदिन प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रामदेव गल्ली, बेळगाव येथील गिरीश कॉम्प्लेक्शच्या शहीद भगतसिंग सभागृहात रविवार दि. १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल्गार …

Read More »

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलैला

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला… एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर …

Read More »

पुलवामामध्‍ये पोलीस-सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्‍ला, ‘एएसआय’ शहीद

काश्मीर : दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्‍ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या (सीआरपीएफ) संयुक्‍त पथकावर आज (दि. १७) दहशतवादी हल्‍ला झाला. या हल्‍ल्‍यात ‘सीआरपीएफ’चे एएसआय शहीद झाले. या हल्‍ल्‍यानंतर परिसरातील शोध मोहिम तीव्र करण्‍यात आली आहे. पुलवामामधील सर्कुलर रस्‍त्‍यावरील बथुरा क्रासिंगजवळील तैनात असणार्‍या पोलीस व सीआरपीएफ पथकावर दहशतवाद्‍यांनी अंदाधूंद गोळीबार …

Read More »

मार्कंडेय नदी ओव्हरफ्लो!

  बेळगाव : पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे …

Read More »

खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!

  कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे कळपात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत दोघांकडूनही जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिवराव मंडलिक कारखाना …

Read More »

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा

नवी दिल्ली :  विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याची घोषणा शरद पवार यांनी केली. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार …

Read More »