तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय ६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने वाचली. अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या …
Read More »गोव्यातील काँग्रेसच्या ‘त्या’ आठ आमदारांपैकी पाच आमदार चेन्नईला रवाना
पणजी : गोव्यातील ११ काँग्रेस आमदारांपैकी ८ जण फुटण्याची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यावर पडदा पडतो न पडतो तोच आता पुन्हा काँग्रेसचे आमदार फुटण्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आठ आमदार फुटू नयेत यासाठी आपल्या पाच आमदारांना चेन्नई येथे पाठवले आहे. मार्च २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या …
Read More »उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, नड्डा यांनी केली घोषणा
नवी दिल्ली : शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच …
Read More »संकेश्वरात रस्त्यांची वाट लागलीयं….!
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील बरेच रस्ते पावसाच्या पाण्याने उखडलेले दिसताहेत. बऱ्याच रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी तसेच ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांत पावसाचे पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील अंबिका नगरला जाणारा रस्ता चांगलाच गैरसोयीचा बनलेला …
Read More »बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे : प्रा. व्ही. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : विश्वगुरु श्री बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे असल्याचे मजलट्टी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभामंडप येथे गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित एकदिवसीय विशेष व्याख्यान कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य बैलूरचे परमपूज्य श्री बसव चेतन देवरु …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायत हद्दीतील अवचारहट्टी येथे विद्युत्त अदालत संपन्न
बेळगाव : शनिवार दि. 16/07/2022 रोजी सकाळी हेस्कॉमच्या वतीने विद्युत्त अदालत संपन्न झाली. यावेळी अवचारहट्टी गावामधील विजेच्या संदर्भात गावातील नागरिकांनी व येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांनी गावामधील विविध विद्युत्त समस्या मंडल्या. शेतातील विद्युत्त खांब व्यवस्थित करून देणे, विजेचे जूने खांब बदलून नवीन खांब बसविणे, गावातील खासगी जागेत असलेले टीसी (ट्रान्सफार्मर) …
Read More »मराठा विकास महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या : राष्ट्रवादी काँग्रेस
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने स्थापन केलेल्या मराठा विकास महामंडळाचे शिवाजी महाराज मराठा समाज विकास महामंडळ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव येथे जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. कर्नाटक सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, मराठा विकास महामंडळासाठी सरकारने …
Read More »कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड
संवर्धनासाठी देण्याचा उपक्रम कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांचा सहभाग कोल्हापूर : मे. अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप वाटप कार्यक्रम आज कोरगावकर पेट्रोल पंप येथे …
Read More »माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या वाढदिवस वृध्दांना शाल वाटपाने साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिल्व्हर डेल वृध्दाश्रमातील वृध्दांना वूलन शॉल वाटपाने माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेचे संचालक बसनगौडा पाटील यांचेमार्फत शॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिल्व्हर डेल वृध्दाश्रमाच्या प्रमुख क्विझंटी यांनी बसनगौडा पाटील …
Read More »तांत्रिक कारणामुळे अडलेल्या दोन लाख घरांचा प्रश्न मार्गी : मुख्यमंत्री बोम्मई
हुबळी : तांत्रिक कारणामुळे दोन लाख घरांना मंजुरी मिळण्यास विलंब झाला होता, तो आता दूर करण्यात आला आहे. कच्च्या घरांचे पक्क्या घरात रूपांतर करण्याचा विचार आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी शहरातील विमानतळावर शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पाण्याचा वापर प्रमाणानुसार करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta