Monday , September 21 2026
Breaking News

मराठा विकास महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या : राष्ट्रवादी काँग्रेस

Spread the love

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने स्थापन केलेल्या मराठा विकास महामंडळाचे शिवाजी महाराज मराठा समाज विकास महामंडळ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव येथे जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.
कर्नाटक सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, मराठा विकास महामंडळासाठी सरकारने दरवर्षी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी, सैनिक शाळा सुरू करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन आज बेळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दुर्गेश मेत्री म्हणाले की, सरकारने कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे. बेळगाव तालुक्यात मराठा समाजाची लोकसंख्या मोठी असून, गरीब मराठा मुलांच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सैनिकी निवासी शाळा सुरू कराव्यात. सर्व निवासी शाळांना छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, कृष्णा कांबळे, के. जी. पाटील, नारायण बसर्गे यांच्यासह मराठा समाजाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *