Sunday , September 20 2026
Breaking News

माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या वाढदिवस वृध्दांना शाल वाटपाने साजरा

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिल्व्हर डेल वृध्दाश्रमातील वृध्दांना वूलन शॉल वाटपाने माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
येथील श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेचे संचालक बसनगौडा पाटील यांचेमार्फत शॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिल्व्हर डेल वृध्दाश्रमाच्या प्रमुख क्विझंटी यांनी बसनगौडा पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बोलताना बसनगौडा पाटील म्हणाले आंमच्या एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा वाढदिवस आपण शॉल वाटपाने सत्कारणी लावण्याचे कार्य केले आहे. साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याबरोबर धार्मिक सहकारी क्षेत्रातही चांगले कार्य चालविले आहे. यावेळी वृद्धाश्रमातील वृध्दांनी ए. बी. पाटील यांना आयुरारोग्य लाभ अशी प्रार्थना केली.
यावेळी अनिल पाटील, संतोष पाटील, काडप्पा थरपट्टी, दुंडाप्पा हेब्बाळे उपस्थित होते. दरम्यान ए. बी. पाटील अभिमानींनी वृध्दाश्रमात फळ वाटपाने साहेबांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *