Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

ड्रेनेज पाईपलाईनचे कामकाज तातडीने पूर्ण करा

चव्हाट गल्लीतील रहिवासी संतप्त बेळगाव : चव्हाट गल्ली येथे ड्रेनेज ड्रेनेज पाईपलाईनचे कामकाज हाती घेण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून हे कामकाज बंद पडले आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ड्रेनेज ड्रेनेज पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत असल्याने अनेकजण याठिकाणी पडून जखमी होत आहेत. हे कामकाज तातडीने पूर्ण …

Read More »

तिसर्‍या रेल्वेगेटजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर

बेळगाव : बेळगावातील टिळकवाडीतील तिसरे रेल्वे गेट खानापूर रोडवरील गजानन सॉ मिलजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना अडचण होत आहे. याबाबत महापालिका अधिकार्‍यांना वारंवार कळवूनही काहीच उपयोग झाला नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. बेळगावातील टिळकवाडीतील तिसर्‍या रेल्वे गेटजवळील गजानन सॉ मिलजवळील भागात स्वच्छतेचे थैमान माजले आहे. येथील गटारी बुजल्याने …

Read More »

दुर्गम भागातील गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील

युवा नेते उत्तम पाटील : शिरगुप्पीत विविध कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे …

Read More »

शहरातील मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा

श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात असलेल्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने येथील शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांना देण्यात आले. परिसरातील अनेक मशीदवर बेकायदेशीर भोंगे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांच्या जन्मदिनानिमित्त पाठ्यपुस्तक व शालोपयोगी साहित्याचे वितरण

बेळगाव : ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शाळांना शालोपयोगी साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करत अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जन्मदिन अत्यंत विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरुवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येणार्‍या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात …

Read More »

शहरातील लेंडी नाला साफसफाईला प्रारंभ

बेळगाव : गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार सध्या लेंडी नाला सफाईचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर बळ्ळारी नाला स्वच्छ केला जाईल, माहिती शहराचे आमदार अनिल बेनके यांनी दिली. पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा होण्यामध्ये लेंडी नाला हा महत्त्वाची …

Read More »

टॅक्स प्रॅक्टिशनर्स : उद्या अधिकारग्रहण सोहळा

बेळगाव : बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2022 -23 सालच्या व्यवस्थापकीय समितीचा अधिकारग्रहण सोहळा येत्या शुक्रवार दि. 13 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. टिळकवाडी तिसर्‍या रेल्वे गेट नजीक असलेल्या हॉटेल संतोरिनी येथे येत्या शुक्रवारी सायंकाळी 8:30 वाजता हा अधिकार ग्रहण सोहळा होणार आहे. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य …

Read More »

संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना

पुणे : मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत नविन 3000 गॅस शेगडी कनेक्शन वितरण

बेळगाव : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्त्वाकांक्षी महिलांसाठी उज्ज्वला योजना अंतर्गत बेळगांव ग्रामीणमधील कंग्राळी खुर्द, मोठी कंग्राळी,-आंबेवाडी, मण्णुर, गोजगे, उचंगाव,-सुळगा, बेक्किनकीरे, तुरमुरी, कुद्रेमनी, बेळगुंदी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी व सांवगाव या गावातील महिलांना मोफत गॅस शेगडी कनेक्शन वितरण करण्यात आले. बेळगांव लोकसभा खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली व …

Read More »

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश

बेळगाव : गंगावती कोप्पळ येथे नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या ऑल इंडिया इन्व्हिटेश्नल कराटे चॅम्पियनशिप -2022 या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटुंनी घवघवीत यश संपादन केले आहे. गंगावती कोप्पळ (कर्नाटक) येथील केबीएन गार्डन क्रीडा संकुलामध्ये उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे अलीकडेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इंडियन कराटे क्लब बेळगाव …

Read More »