Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : पत्रकारिता करणे अत्यंत कठीण असते. प्रसंगी युद्धभूमीवर जाऊन सुद्धा पत्रकारांना वार्तांकन करावे लागते. यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडे कमी आहे, असे उद्गार प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले. आज बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 45 वा वर्धापन दिन ‘पत्रकार भवन’ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष …

Read More »

सर्वदा सोसायटीच्या अध्यक्षपदी सचिन पुरोहित तर उपाध्यक्षपदी धनंजय पाटील

  बेळगाव : गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या दि. 24 जुलै रोजी बिनविरोध झाली. सामान्य व अनुसूचित जाती यामधील अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये संचालक म्हणून सचिन के. पुरोहित, धनंजय रा. पाटील, रमेश वाय. पाटील, बाबू एम. पावशे, श्रीनाथ पी. …

Read More »

दावणगिरी येथे बुधवारी सिद्धरामय्यांचा अमृत महोत्सव

लक्ष्मणराव चिंगळे : १० लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि दिन, दलित, अल्पसंख्यांक, शोषितांचे कैवारी सिद्धरामय्या त्यांचा अमृत महोत्सव उद्या बुधवारी (ता.३) दावणगिरी शहराबाहेर होणार आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …

Read More »

संजय राऊत यांना चार दिवसांची ‘ईडी’ कोठडी

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्‍यायालयाने त्‍यांना न्‍यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली. संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

Read More »

‘शिवसेना आणि मी तुमच्यासोबत’; राऊतांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरेंकडून धीर

  मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी दाखल झाले आहेत. …

Read More »

किरण जाधव यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट

  बेळगाव : भारतीय जनता पक्ष कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे कार्यदर्शी किरण जाधव यांनी नुकतीच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. “आत्मनिर्भर भारत, मेक ईन इंडिया, मेड ईन इंडिया” अंतर्गत बेळगावमध्ये संरक्षण विभागाशी निगडित वाहन निर्मिती उद्योग सुरू केला जावा या संदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाली. जमिनीत पेरणी …

Read More »

बनावट अकाऊंटचा वापर करून बदनामी करणार्‍यांवर लवकरच कारवाई; बी. आर. गड्डेकर यांची माहिती

  बेळगाव : पत्रकार महिला आणि नागरिकांची बनावट अकाऊंटद्वारे बदनामी करणार्‍यांवर कायद्याच्या चौकटीतून लवकरच कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन बेळगाव सायबर पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी दिले. सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार संघाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक गडेकर यांची …

Read More »

आधार क्रमांक मतदार यादीशी जोडण्याच्या प्रक्रियेला बेळगावात प्रारंभ

  बेळगाव : आधार क्रमांक मतदार यादीशी जोडण्याच्या प्रक्रियेचा लोकार्पण सोहळा डीसीपी रवींद्र गडाडी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र गडादी म्हणाले की, मतदार यादीशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबरमध्ये दुरुस्ती केली. शासनाने कोणताही कार्यक्रम राबविला तर त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची …

Read More »

लोकमान्य टिळकांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन!

  बेळगाव : शहरातील टिळक चौक ऑटो रिक्षा ओनर्स असोसिएशनतर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करून अभिवादन करण्यात आले. टिळक चौक येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या …

Read More »

लोंढा-केसलरॉक- हुबळी रेल्वे लवकरच सुरू

  खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या मिरज ते लोंढा, हुबळी मार्गावरील रेल्वे पुन्हा 25 ऑगस्ट व 26 ऑगस्टपासून धावणार आहेत. या एक्सप्रेस असल्यातरी आरक्षित नाहीत त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मिरज-लोंढा-मिरज 07251 व 07352 या क्रमांकाची रेल्वे मिरजहून 25 ऑगस्टला तर लोंढ्यातून 26 ऑगस्टपासून धावणार …

Read More »