Friday , June 5 2026
Breaking News

गोव्याकडे येणार्‍या प्रवासी विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानला वळवलं!

Spread the love

 

पणजी : रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या विमानावर तब्बल 240 प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भात सविस्तर तपास लागलीच सुरू करण्यात आला आहे. याआधीही 10 जानेवारी रोजी अशाच प्रकारची धमकी मॉस्को-गोवा विमानासंदर्भात देण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?
Moscow-Goa AZV2463 हे प्रवासी विमान आज पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी दक्षिण गोव्यातील डाबोलिम विमानतळावर उतरणार होतं. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास डाबोलिम विमानतळाच्या संचालकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला. त्यामुळे विमान भारतीय हवाई हद्दीत शिरण्याआधीच हे उझबेकिस्तानकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशाने निधन

Spread the love  खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *