Sunday , July 26 2026
Breaking News

सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत कोटींची देणगी

Spread the love

 

बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत मागील महिनाभरात देणगी स्वरूपात एक कोटी दहा लाख 39 हजार रुपये देणगी जमा झाली आहे. बुधवार तारीख 18 आणि 19 रोजी मंदिरातील दानपेटीत आलेल्या देणगीची मोजदाद करण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यातील ही दानपेटी होती. देवीची देणगी पेटी उघडण्यात आली असून त्यात पंधरा लाख रुपयांची रोख देणगी जमा झाली आहे. यासह सहा लाख 66 हजार रुपये किमतीचे 119 ग्रॅम सोने, आठ लाख 74 हजार 965 ग्रॅम चांदी देणगी स्वरूपात मिळाली आहे.
मंदिरातील 50% देणगी पेटी मोजदातीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील आठवड्यात केले जाणार आहे, अशी मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी बसवराज जिरयाळ यांनी दिली.

देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मंदिराचे कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी धर्मादाय खाते तहसीलदार आणि सौंदत्ती पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील दानपेटी उघडण्यात आल्या देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून डोंगरावर पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप इतर विकास कार्य हाती घेतले जाणार आहेत, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ यांनी दिली.
प्रसंगी मंदिराचे अधीक्षक अरविंद मेलगे, सदस्य वाय. वाय. कल्लपनावर, कल्लाप्पगौडा गंदीगवाड, लक्ष्मी हुली, संतोष सिरसंगी, डी. आर. चव्हाण, एम. एस. यलीगार, एम. पी. ध्यामनगौडर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *