Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

लोंढा-केसलरॉक- हुबळी रेल्वे लवकरच सुरू

  खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या मिरज ते लोंढा, हुबळी मार्गावरील रेल्वे पुन्हा 25 ऑगस्ट व 26 ऑगस्टपासून धावणार आहेत. या एक्सप्रेस असल्यातरी आरक्षित नाहीत त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मिरज-लोंढा-मिरज 07251 व 07352 या क्रमांकाची रेल्वे मिरजहून 25 ऑगस्टला तर लोंढ्यातून 26 ऑगस्टपासून धावणार …

Read More »

गळे कापणार्‍या जिहाद्यांपासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचायचे असेल, तर हिंदूंनी आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल! : टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

  नवी दिल्ली : नुपूर शर्माचे समर्थन केले म्हणून राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये हिंदूविरोधी शक्तींकडून हिंदूंच्या गळे कापून हत्या केल्या जात आहेत. हिंदू आणि देशविरोधी जिहादी शक्ती यांच्यात युद्धाला आरंभ झालेला आहे. युद्धाचा बिगुल वाजलेला आहे. हिंदू जर ‘सेक्युलर’ राहिला, तर तो आणि त्याचा परिवार वाचणार नाही. सरकार आणि …

Read More »

स्मारक भवनसाठी माणिक होनगेकर यांची एक लाख रुपये देणगी

  बेळगाव : हिंडलगा येथे एक जुन 1986 च्या कन्नड सक्ती विरोधात जे आंदोलन छेडले होते. त्यावेळी पोलिसांच्या बेछूट गोळीबारात ज्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथील अकरा गुंठे जागेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच्या बाजूला भव्य भवन बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शनिवार दिनांक 30 …

Read More »

हुक्केरी रोलर स्केटिंगपटूंचे घवघवीत यश

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. गडहिंग्लज येथ नुकतेच खुल्या पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी सहभागी होऊन यश मिळवले आहे. सर्व विजेत्या स्केटिंगपटूंचे अकॅडमीच्या अध्यक्षा सौ. संगिता कल्याणकुमार निलाज यांनी …

Read More »

ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

  बेळगाव : वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना आज सकाळी भाजी मार्केटजवळ घडली. सादिया पालेगार (वय 16) असे ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकाच्या दुचाकीवरून सादिया पालेगार भरतेश स्कूलकडे जात असताना सेठ पेट्रोल पंप …

Read More »

म. ए. समितीच्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा येळ्ळूरवासियांचा निर्धार

  बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी जि. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी पत्रकांसाठी हे आंदोलन होणार असल्याने मोठ्या संख्येने या आंदोनात सहभागी होण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला. श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये रविवारी रात्री येळ्ळूर विभाग म. ए. समिती येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या …

Read More »

हदनाळ येथील गणेश मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

परम पूज्य परमात्मराज महाराज यांचे दिव्य सानिध्य कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथे लोकवर्गणी व श्रमदानातून नव्याने बांधण्यात आलेल्या गणेश मंदिरामध्ये श्री गणेश मूर्तीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना श्री क्षेत्र आडी येथील परम पूज्य परमात्मराज महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला. सकाळी १० वाजता सजविलेल्या बैलगाडीतून मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरुन सवाद्य मिरवणूक …

Read More »

संजय राऊतांना रात्री उशिरा अटक, आज कोर्टात हजर करणार

  मुंबई : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 …

Read More »

अचिंता शेउलीने रचला इतिहास! वेटलिफ्टिंगमध्ये मिळवले सुवर्णपदक

  बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अचिंता शेउलीने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. अचिंताने पहिल्या स्नॅच फेरीत 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये त्याने 139 किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. अशाप्रकारे …

Read More »

खणदाळ येथे उद्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव

संकेश्वर (महंमद मोमीन) : खणदाळ तालुका गडहिंग्लज येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »