Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर कृषी खात्याच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कृषी खाते आणि खानापूर तालुका कृषी खात्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, डॉ. आर. बी. सुतगुंडी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. …

Read More »

मॉडेल सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल सायन्स अँड कॉमर्स इंटिग्रेटेड पीयू कॉलेज आणि अर्थ कोटा करियर अकॅडमीमधील पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे एसीपी एन. एस. बरमनी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील काकतकर, संचालक अमित …

Read More »

संकेश्वरात मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नवी गल्ली येथील युवक शिवानंद राजू शिडल्याळी (वय २३) यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आज गौरी ओढ्यातील वृक्षाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवानंद मानसिक त्रासाने अस्वस्थ होता. त्यातच त्याला फिटस आजाराने बेजार केले होते. तो सध्या येथील आझाद रस्ता इंद्रभवन …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : सलगरे जि.सांगली ते कर्नाटक हद्दी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली होती त्यामुळे सीमाभागातील अथणी तालुक्यातील गावातील सीमावासीयांना त्रास सहन करावा लागत होता त्या संदर्भात सांगलीचे मा.जिल्हाधिकारी साहेब याना हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा यासाठी मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले होते त्याची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रथम सार्वजनिक बांधकाम …

Read More »

यूपीमध्ये पुन्हा योगी राज

यूपीमध्ये पुन्हा योगी राज; जाणून घ्या एका क्लिक वर नवीन मंत्र्यांची यादी लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली आहे.   योगी आदित्यनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ …

Read More »

भर रस्त्यात पतीकडून पत्नीचा निर्घृण खून

बेळगाव : घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरू असलेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली आहे. हिना कौसर नदाफ (वय 24) रा. चिंच मार्केट उज्वल नगर बेळगाव असे या मयत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडलेल्या या खून नाट्याचा थरार पहाण्यासाठी …

Read More »

खानापूर ता. पं. कार्यालय कार्यनिर्वाहक अधिकारीविनाच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभळणारे तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी पद गेल्या काही महिण्यापासून रिक्तच आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयाबरोबरच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयातील कामकाज तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैर सोय होय. खानापूर …

Read More »

साहित्य शारदेनेच लावून घेतले माझ्याकडून रोपटे : मधु मंगेश कर्णिक

मुंबई (लक्ष्मण राजे) : “कोकण मराठी साहित्य परिषद हे ३१ वर्षांपूर्वी मी रोपटे लावले होते, खरे तर ते मी लावले नाही, तर साहित्य शारदेनेच ते माझ्याकडून लावून घेतले असावे, आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून त्याच्या सावलीत असंख्य कवी, कवयित्री, लेखक कार्यरत आहेत, हे माझे भाग्यच आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ …

Read More »

फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुपच्या वतीने भजनानंद शाखेचे उद्घाटन!

पुणे (लक्ष्मण राजे) : दिनांक २४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता चरोल्ही येथील प्राईड वर्ल्ड सिटी संकुलातील किंग्जबरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील दालनात “फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुप”च्या वतीने “भजनानंद” शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ.ललिता राजे आणि प्रमुख पाहुण्या सौ. सुनिता डेंगरे यांच्या …

Read More »

निपाणीत चोरट्यांचे डेरिंग वाढले; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे घर फोडले

निपाणी : निपाणी शहर उपनगर व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात निपाणी शहर व उपनगरात 40 घरफोड्या झाल्या आहेत. …

Read More »