Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

आम्ही जातो बदलीवर आमचा रामराम घ्यावा…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची लवकरच अन्यत्र बदली होणार असल्याची चर्चा नगरसेवकांतून केली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून ईटी संकेश्वर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावित आहेत. पालिकेत मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभर त्यांची कामगिरी चांगली ठरली. तदनंतर त्यांचा मनमानी कारभार सुरू झाला तो अद्याप चालूच …

Read More »

बेंगलोर ते काशी रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार

बेळगाव : कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जात असतात त्यामुळे भक्तांना सोयीस्कर व्हावे याकरिता बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा सुरू होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. कर्नाटकातून निघणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारकडून पाच …

Read More »

देशाचे नांव उज्ज्वल करणार्‍या जलतरणपटुंचा सत्कार!

बेळगाव : कोलंबो श्रीलंका येथे अलीकडेच पार पडलेल्या इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करणार्‍या इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी (कोरी) या जलतरणपटुंचा बेळगावात खास सत्कार करण्यात आला. कोलंबो (श्रीलंका) येथील इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट …

Read More »

खानापूरात सकल योजनाची वर्षपूर्ती फेरी

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी योजनेच्या सकल योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खानापूर तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि. २० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून सकल योजनेची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांच्याहस्ते सकल योजनेच्या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयापासून फेरीची सुरूवात झाली. शिवस्मारकातून बाजार …

Read More »

हलगा कलमेश्वर यात्रा अपूर्व उत्साहात; इंगळ्या कार्यक्रमात भाविकांनी घेतला सहभाग

बेळगाव : हर हर महादेवचा जयघोष आणि भक्तांचा अपूर्व उत्साह या सार्‍या भक्तिपूर्ण वातावरणात बेळगाव तालुक्यातील हलगा गावची श्री कलमेश्वर देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. बेळगाव तालुक्यातील हलगा या गावात सालाबादप्रमाणे श्री कलमेश्वर यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेच्या निमित्ताने इंगळ्या कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य भक्तांनी …

Read More »

चौथ्या लाटेची भीती; सरकारकडून खबरदारी : आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर

बेंगळुर : दिल्ली आणि इतर राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बुधवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, दिल्लीसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

गुणरत्न सदावर्ते आता कोल्हापूरला पोहोचणार; पोलीसांना मिळाला ताबा

कोल्हापूर : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलीसांना मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता सातार्‍यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता कोल्हापूरला …

Read More »

पंजाबमध्ये आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 मुलांसह सात सदस्यांचा मृत्यू

लुधियाना : मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बलदेव राज यांनी सांगितले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुरेश (54), …

Read More »

खानापूर शहराजवळील महामार्गाची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे विविध सरकारी कार्यालयाना निवेदन सादर

बेळगाव : येत्या 25, 26, 27, 28 एप्रिल रोजी होत असलेल्या येळ्ळूर चांगळेश्वरी व कलमेश्वर, यात्रेसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस सीपीआय श्रीनिवास हंडा यांना तसेच विविध सरकारी कार्यालयाना येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. येळ्ळूर यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाली नव्हती. यावर्षी यात्रा होत असून ती मोठ्या उत्साहात …

Read More »