Sunday , July 26 2026
Breaking News

उद्या मद्य विक्री दुकाने बंद!

Spread the love

बेळगाव : रविवार दि. 10 जुलै रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी शहर व तालुक्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद राहतील, असा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा न्यायदा दंडाधिकारी डॉ. एम. बी. बोर्लिंगय्या यांनी जरी केला आहे.
9 जुलै रात्री 12 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब बंद राहतील. हॉटेलमध्ये ग्राहकांना मद्य प्राशन करण्यास देणे व विक्रीवर पूर्णपणे निर्बंध असतील. एपीएमसी येथील केएसबीसीएल डेपो देखील बंद राहील. त्यामुळे सर्व परवानाधारक मद्य विक्रीधारकांनी रविवारी दुकाने बंद ठेवावीत. या आदेशाचे अबकारी अधिकार्‍यांनी अंमलबजावणी करावी व आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा आदेश पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोर्लिंगय्या यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *