Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी

सौंदलगा : सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास अधिकारी अशपाक शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. ग्रा.पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर विनोद कांबळे यांनी बुद्धवंदना गायिली. यावेळी ग्रा. पं. …

Read More »

खानापूर अग्नीशमन दलाच्या सेवा सप्ताहाला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या रूमेवाडी क्रॉसवरील अग्नीशमन दलाच्या सेवा सप्ताहाला प्रारंभ गुरूवारी दि. 14 एप्रिलपासून सुरू झाला. अग्नीशमन दलाचा सेवा सप्ताह गुरुवार दि. 14 एप्रिल ते दि 20 एप्रिल पर्यंत होणार आहे. गुरूवारी दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन सेवा सप्ताहाला प्रारंभ झाला. 14 एप्रिल 1944 …

Read More »

संकेश्वरात पार्श्वलब्दीतर्फे महाप्रसाद वाटप

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पार्श्वलब्दी ग्रुप, श्रावकगण आणि बेळगांव पार्श्वलब्दी सेवा ट्रस्टच्या वतीने वर्धमान महावीर जयंती आणि परमपूज्य कर्नाटक केसरी आचार्य श्री भद्रंकरसूरीश्वरजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर समुदाय भवनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धमान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादसेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. …

Read More »

संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी रमेश जारकीहोळींनी केला नवा गौप्यस्फोट

बेळगाव : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी प्रत्येक क्षणाला नवनवे दावे केले जात असून माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही आता याप्रकरणी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याबाबत सीडी प्रकरणी रचण्यात आलेल्या षडयंत्रातील समूहाचा संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची …

Read More »

सर्वधर्म समभाव ठेवूनच विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार राजेश पाटील

अडकुर येथील विविध 1 कोटी 35 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवरच आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. घटनेत दिलेले मूलभूत अधिकार आणि आंबेडकर यांनी घालून दिलेल्या बुद्धांच्या विचारावरच या देशांमध्ये शांतता नांदावी. सर्वधर्म समभाव आपल्यात असावा आणि सर्व जाती, …

Read More »

ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा राजीनामा देणार!

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अडचणीत बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ते उद्या (ता. 15) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील. बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभुत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने …

Read More »

आयसीएलच्या सेवा कार्यालयाचे बेळगावात उद्घाटन

बेळगाव : “बेळगावचा देशातील विविध राज्यांशी आणि शहरांशी व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीने संपर्क वाढला असून बेळगावात इंटिग्रेटेड कुरियर्स अंड लॉजिस्टिक (आयसीएल) सेवा सुरू झाल्याने ग्राहकांची उत्तम सोय झाली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आयएक्सजीची निवड झाली आहे. यामुळे बेळगावकराना जगभरात आपल्या वस्तू कमीत कमी वेळात पाठविता येणे शक्य आहे” असे विचार …

Read More »

देशाची राज्यघटना हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ : जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंती उत्साहात बेळगाव : जात-पात, धर्माचा विचार न करता देशातील सर्व वर्गातील लोकांच्या हिताचा विचार करणारी राज्यघटना निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. आंबेडकरांनी निर्माण केलेली देशाची राज्यघटना हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी …

Read More »

खानापूर हेस्काॅम कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी झाली. हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी बोलताना हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. म्हणाले की, …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बॅ. नाथ पै व्याख्यानमाला 17 एप्रिलपासून

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी ‘बॅ नाथ पै व्याख्यानमाला’ कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती ती आता एप्रिल महिन्यात होणार असून त्याचे पहिले पुष्प दि. 17 एप्रिल रोजी गोव्याचे डॉ. साईश देशपांडे हे गुंफणार आहेत ‘गोव्यातील लोक कला- स्वरूप आणि अविष्कार’ हा त्यांचा विषय …

Read More »