बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे युद्ध स्मारक गार्डन, हिंदवाडी, बेळगाव येथे एक विशेष वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. केवळ २ तासांमध्ये ३५ हून अधिक रोपे लावण्यात आली. खड्डे खोदणे आणि झाडे लावण्याचे सर्व काम सदस्यांनी स्वतः उत्साहाने पार पाडले. सार्वजनिक जनजागृतीसाठी बॅनर्सच्या माध्यमातून संदेश …
Read More »चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी : प्रमोद मुतालिक
बेळगाव : बेंगळुरू येथील आर.सी.बी. विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागितल्यास तो मोठा गुन्हा ठरणार नाही, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मुतालिक म्हणाले की, आर.सी.बी.च्या विजयाच्या जल्लोषात घडलेली ही दुर्घटना …
Read More »आरसीबीवर मोठी कारवाई, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल
बेंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या २४ तासांनंतर कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजर), कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या विरोधात क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कलम १०५, १२५ (१) (२), …
Read More »अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्येला आळा घालण्याची मागणी हिंदु संघटनांची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या …
Read More »माजी सैनिक संघटना आणि रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना फेडरेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून न्यायालय परिसरात पर्यावरण जागृती आणि मोफत रोपे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण करून मोफत रोपे वाटण्यात आली. यावेळी वनसंवर्धन करून देश …
Read More »मराठा लाईट इन्फंट्रीत ६५९ अग्निवीर जवानांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात
बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत पाचव्या अग्निवीर तुकडीच्या प्रशिक्षणानंतर गेल्या ३१ आठवड्यांपासून लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या ६५९ अग्निवीर जवानांचा दीक्षांत संचलन सोहळा आज गुरुवारी पार पडला. यावेळी जवानांनी शानदार संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी एमएलआयआरसी कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संचलनाची पाहणी …
Read More »श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार कोल्हापूर।: महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर …
Read More »देवाळे विद्यालयाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त विष्णुपंत चिकोडे यांच्या स्मरणार्थ 61 हजार रुपयाची देणगी
निपाणी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बहुजन समाजात शैक्षणिक विकास व्हावा यासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेने देवाळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे देवाळे विद्यालय सुरू केले याच विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत देवाळे ग्रामवासीयाच्या …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक शिक्षिका शामला चलवेटकर उपस्थित होत्या. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे …
Read More »मिरज माहेर मंडळात पर्यावरण दिन साजरा…
बेळगाव : मिरज माहेर मंडळात जुनच्या मासिक बैठकीत शोभा लोकूर यांच्या सोमवार पेठ निवासस्थानी नुकताच पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पाहुण्या म्हणून पर्यावरण व बाग प्रेमी दीपा देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंडळात त्यांचे अध्यक्ष अस्मिता आळतेकर व सेक्रेटरी दीपा बापट यांच्या हस्ते रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta