बेळगाव : हाजगोळी येथील डॅम परिसरात पाण्यात बुडालेल्या बेळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल १८ ते २० फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यात हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन (HERF) च्या पथकाला यश आले. रात्रभर सुरू असलेल्या अथक शोधमोहीमेनंतर ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार नामदेव पाटील (वय २२) …
Read More »बेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावा
बेळगाव : विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधण्यासाठी तसेच पालकांना एकाच ठिकाणी परिचयाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज, रविवार दि. 31 मे 2026 रोजी बेळगाव येथे वधू-वर, पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्र यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. …
Read More »आयपीएल फायनलच्या पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यास बंदी; बेळगाव पोलिसांचा इशारा
बेळगाव : टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने धडक मारल्यानंतर संभाव्य जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना विविध नियम व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी जारी …
Read More »खानापूरात बेकायदेशीर गावठी बंदूक निर्मिती रॅकेटचा पर्दाफाश; १३ आरोपी अटकेत
बेळगाव : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी बंदूक निर्मिती आणि विक्रीच्या रॅकेटचा खानापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९ गावठी बंदुका, दारूगोळा तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात …
Read More »धाराशिवच्या संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार
मराठी भाषा, संस्कृती आणि सीमावासीयांच्या न्यायहक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या या संमेलनात सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांनाही प्रभावीपणे वाचा फोडण्यात आली. संमेलनाचे अध्यक्ष …
Read More »रयत गल्ली, वडगाव येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात प्रारंभ
बेळगाव : रयत गल्ली, माधवपूर वडगाव येथे श्री बाल भजनी मंडळ, श्री शिवजयंती उत्सव मंडळ आणि श्री गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री ज्ञानेश्वर पारायण सेवा मंडळ, राजवाडा कंपाउंड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे. परिसरात सध्या …
Read More »शिवसेना उपनेते अरुणभाई दूधवाडकर यांनी शुभम शेळके यांची घेतली सदिच्छा भेट..!
बेळगाव : महाराष्ट्रातील शिवसेना उपनेते, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख तसेच बेस्टचे माजी अध्यक्ष अरुणभाई दूधवाडकर यांनी आज म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची सदिच्छा भेट घेतली. सिंधुदुर्ग व कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या अरुणभाई दूधवाडकर यांनी आज शनिवारी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी शुभम शेळके यांच्या …
Read More »काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी डी. के. शिवकुमार यांची निवड
बुधवारी लोकभवनात होणार शपथविधी बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची शनिवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आता शिवकुमार राज्यपालांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील. दरम्यान, बुधवारी (ता. ३) बंगळुरातील लोकभवनातील ‘ग्लास हाऊस’मध्ये हा …
Read More »महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मध्यवर्ती म. ए. समितीचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा 29 जून रोजी निवासस्थानी धरणे आंदोलन….
बेळगाव : सरकारी कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील नामफलकांवर ६० टक्के कन्नड भाषेसोबत ४० टक्के मराठी भाषेला प्राधान्य देऊन तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसे न झाल्यास पुढील २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीने दिला आहे. खानापूर रोडवरील …
Read More »निपाणीत नवविवाहितेची गळफासाने आत्महत्या
सासरकडून मानसिक छळाचा आरोप; सासूविरोधात पोलिसात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : सासरकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून लग्राच्या ३९ व्या दिवशी नवविवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना निपाणी येथे उघडकीस आली आहे. गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी (वय ३६, रा. हरीनगर १ ली गल्ली, निपाणी) असे तिचे नाव आहे. घटनेची नोंद शहर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta