बेळगाव : सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला. यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने जमून निवेदन देण्याचे ठरले होते पण सदर घटनेबाबत वातावरण चिघळले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने बी ई ओ अधिकारी यांनी थेट …
Read More »शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी व वृक्षारोपण
कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश …
Read More »पाच वर्षांत मित्रांना ३ हजार रोपांची भेट निसर्गप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; वृक्षप्रेम वाढविण्याचा घेतला वसा
जागतिक पर्यावरण दिनविशेष निपाणी (विनायक पाटील) : वाढदिवस, विवाह, वास्तूशांती, स्मृतिदिन, रक्षा विसर्जन अशा विविध प्रकारचच्या निमित्ताने इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा देशी वृक्षाचे रोपटी भेट देऊन वृक्षप्रेम वाढविण्याचा वसा येथील गायत्री नगरातील पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी जपला आहे. ५ वर्षांत त्यांनी ३ हजार रोपे मित्र परिवार व …
Read More »जागतिक पर्यावरण दिन विशेष : “ओ री चिरैया… नन्ही सी चिडिया, अंगना में फिर आ जा रे…”
एकेकाळी सकाळची सुरुवात घड्याळाच्या अलार्मने नव्हे, तर पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने व्हायची. अंगणात चिमण्या दाणे टिपत असायच्या, झाडांच्या फांद्यांवर पक्ष्यांची लगबग असायची आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून जायची. निसर्ग हा घराचा एक सदस्यच वाटायचा. मात्र आज चित्र बदलले आहे. काँक्रीटच्या उंच इमारती, वाढते प्रदूषण, मोबाईल-टीव्हीच्या आभासी जगात हरवलेले …
Read More »मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बेळगाव : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड शाळा भरविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील मराठी बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एकत्र येत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० …
Read More »सावगावमध्ये मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळेला विरोध
बेळगाव : सावगाव येथील सरकारी मराठी उच्च मुला-मुलींच्या शाळेच्या इमारतीत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या हालचालींमुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवित कन्नड शाळेसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या हा आधीच चिंतेचा विषय असताना, …
Read More »उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या ७ तास वीजपुरवठा खंडित
बेळगाव : वीज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हेस्कॉमकडून नियोजित वीज बंद ठेवण्यात येणार असल्याने शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उचगाव व हिंडलगा उपकेंद्रांवरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हेस्कॉम ग्रामीण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उचगाव उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, …
Read More »प्रशासकीय कामांना गती; डी. के. शिवकुमार यांची अधिकाऱ्यांना २५ दिवसांची मुदत
बेंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनाला वेग देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मंत्रालयात सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात सर्व विभागांच्या सचिवांचा आढावा घेत विभागनिहाय प्रलंबित कामांची यादी तयार करण्यास …
Read More »पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. शेवडे
बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या आधीन झाली. बऱ्याच जणांना अहल्याच्या हातून हे पाप अजाणतेपणी झाले असे वाटते, परंतु वाल्मिकी रामायणात मात्र अहल्येने जाणीवपूर्वक हे पाप केल्याचे दिसते. गौतमांच्या येण्याची वेळ झाली हे पाहून तिने इंद्राला तातडीने निघून जाण्याचे सांगितले. गौतमांनी इंद्राला पाहिले …
Read More »जोरदार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराजवळ असलेल्या तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते. याशिवाय डोंगरावरून लहान मोठे दगड पाण्यातून आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाहने थांबवून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta