Sunday , September 20 2026
Breaking News

चव्हाट गल्लीत आठ दिवसांपासून पाणीटंचाई; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत, उद्यापर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाइपलाइन दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने परिसरातील अनेक घरांना नियमित पाणी मिळत नाही. राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही चव्हाट गल्लीत सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना टँकरमधून पाणी भरणे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपायांऐवजी पाइपलाइनची त्वरित दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

या संदर्भात महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कामात विलंब होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले असून, ते पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे स्पष्ट केले आहे.

मात्र, उद्यापर्यंत समस्या न सुटल्यास पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *