Sunday , July 26 2026
Breaking News

पंधरा वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अन्नदानाची सेवा

Spread the love

 

निपाणीतील पठाडे कुटुंबीयांकडून वारकऱ्यांसह भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था

निपाणी (वार्ता) : आषाढी वारीसाठी खडकेवाडा ते पंढरपुर ही दिंडी दरवर्षी जात आहे. या वारीचे येथील प्रगतीनगर येथे मंगळवारी (ता.१४) सायंकाळी आगमन झाले. या भागातील उद्योजक शिवाजी आण्णासाहेब पठाडे यांच्या घरी खडकेवाडा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा होऊन रात्री सर्व वारकरी व परिसरातील भाविकांना अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. पठाडे कुटुंबीयातर्फे सलग १५ व्या वर्षी हे अनुदान करण्यात आले.
दिंडीच्या स्वागतानंतर आंदोलन नगरातील माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री ८ वाजता जय मल्हार सांस्कृतिक भवनात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंढरपूर पायी वारी यात्रा करणाऱ्या भाविकांना शिवाजी पठाडे कुटुंबीयांतर्फे मागील १५ वर्षांपासून अन्नदान केले जात आहे. खडकेवाडा येथील दिंडीचा मुक्काम प्रगती नगरातील शिवाजी पठाडे यांच्या घरी असतो. यानिमित्ताने दिंडीतील शेकडो वारकऱ्यासह भाविकांना रात्रीच्या जेवणाची व्यवस्था येथील जय मल्हार सांस्कृतिक भवनात करण्यात आली होती. प्रगतीनगरात दिंडी आल्यानंतर पठाडे दाम्पत्यांनी दिंडीचे मनोभावे पूजा केली.
——————————————————————–

‘साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा’ या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांच्या येण्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरते. पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. ही भगवंताचीच कृपा आहे आमच्या हातून अशीच सेवा घडत राहो.

-शिवाजी पठाडे, प्रगतीनगर, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *