Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठा समाजाच्या विकासासाठी मंजुनाथ भारती स्वामीजी आज खानापूरात मार्गदर्शन करणार!

  खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …

Read More »

येळ्ळूर समितीचे दोन्ही गट एक करा अन्यथा पर्याय निवडू; समितीच्या युवा कार्यकर्त्यांचा इशारा

  बेळगाव : येळ्ळूरमध्ये म. ए. समितीचे दोन गट कार्यरत आहेत ते दोन्ही गट एक करा अन्यथा आम्ही समिती सोडून आमचा पर्याय निवडू असा थेट इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतील युवा वर्गाने नेत्यांना दिला आहे. येळ्ळूरमध्ये सध्या समितीचे दोन गट सक्रिय आहेत. यामुळे येळ्ळूर मधील समितीच्या युवा कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न निर्माण झालाय …

Read More »

खानापूर तालुक्यातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित

  खानापूर : कर्नाटक विद्युत प्रसारण निगम लिमिटेडकडून तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे खानापूर तालुक्यात सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित राहणार आहे. 110 के. व्ही. खानापूर उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याने तालुक्यातील अनेक गाव व परिसरांना त्याचा …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीचा ज्ञान व मनोरंजन कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, शोभा लोकूर, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी शोभा लोकूर …

Read More »

जात-पात, भाषा, भेदभाव न आणता समाजकार्य केले पाहिजे : श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर

  बेळगाव : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून यामध्ये जात-पात, भाषा, भेदभाव न आणता समाजकार्य केले पाहिजे असे मत श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केले. श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला आज रविवारी सकाळी अनगोळ येथे उत्स्फूर्त  प्रतिसादात प्रारंभ झाला. अनगोळ, बेळगाव येथील राजहंस गल्ली येथे …

Read More »

हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

  खानापूर : हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हलगा आणि परिसरात अध्यक्षांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून जखमी झालेल्या सुनील पाटील यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हलगा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी झालेल्या क्षुल्लक …

Read More »

हलगा- मच्छे बायपाससह राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या विविध रस्ते विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यामध्ये हलगा – मच्छे बायपास रस्त्यासह इतर महत्त्वाच्या महामार्ग कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत बायपास रस्त्याच्या भूसंपादनाची स्थिती, सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती, तांत्रिक अडचणी …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समन्वय’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अविट मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध बेळगाव : द. म. शि. मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘समन्वय’ मराठा मंदिर (खानापूर रोड, जक्केरी होंडा) येथे अत्यंत दिमाखात पार पडले. विविध कलागुण, संगीत आणि प्रबोधनात्मक नाटकांच्या सादरीकरणाच्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात विविध सुरावटींनी झाली. …

Read More »

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा सीसीबी पोलिसांकडून पर्दाफाश

  बेळगाव : बेळगाव शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, मटका अड्डे आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे. कांग्राळी येथील महादेव मंदिर परिसरात हेरॉईन विक्री करताना सीसीबी पोलिसांनी महादेव गजानन पाटील (वय २७) आणि विनायक सुब्बाराव चिन्नाळ्ळर यांना अटक …

Read More »

२३० प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा प्रस्ताव म्हणजे काँग्रेस प्रशासनाचे अपयश : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : राज्यातील तब्बल २३० प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा निर्णय म्हणजे असंवेदनशील व अपयशाचे प्रतिक असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या व नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. या निर्णयामुळे शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असलेल्या गरीब व मध्यमवर्गीय महिलांनी प्रसूतीसाठी नेमके कुठे जावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले …

Read More »