रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार ; इथेनॉल संघर्षमय लढा पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांना ऊस उत्पादनापासून अपेक्षित दरासाठी प्रतिवर्षी आंदोलने करावी लागत आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने अधिक इथेनॉल निर्मितीला चालना देऊन शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास साधण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्नदाता …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन खानापूर तालुका म. ए. समितीचे सहचिटणीस श्री. रणजीत पाटील यांनी केले. कै. दीपक दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य श्री. …
Read More »ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना
अधिकाऱ्यांना नियमित बैठका घेण्याचे निर्देश बंगळूर : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासल्यास तातडीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, या उद्देशाने पुढील तीन महिन्यांपर्यंत दर महिन्याच्या २ऱ्या व ४थ्या सोमवारी पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांच्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अनिवार्य बैठक घेण्याचे निर्देश जिल्हा पंचायतांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना …
Read More »वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या निवृत्तीला दहा दिवस असतानाच दुर्दैवी घटना
बंगळूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित छळाला कंटाळून समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पावगड तालुक्यात घडली आहे. मल्लिकार्जुन (वय ६०), पावगड तालुका समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक, असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची …
Read More »हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या …
Read More »येळ्ळूरमध्ये 5 एप्रिलला श्री. वसंत हंकारे यांचे व्याख्यान; राम नवमी शोभायात्रेची जय्यत तयारी
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर येथील युवा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती, येळ्ळूर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक (शिवस्मारक) येथे “चला तर जाणून घेऊया आई-बाबांच्या वेदना, आजच्या युवा पिढीला …
Read More »रस्त्याकडेच्या चरीत ट्रॉली कोसळून गळतगा येथील चालकाचा दुर्दैवी मृत्यू
निपाणी (वार्ता) : नवीन ट्रॅक्टरला रोटर जोडून नवीन ट्रॅक्टर कारदगाहून गळतगाकडे घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) सायंकाळी सहा वाजता सुमारास घडली. सुधाकर रावसाहेब कोंडेकर (वय ३८) असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर संजय अण्णाप्पा चौगुले …
Read More »कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
बैलहोंगल : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची एक भीषण घटना बैलहोंगल तालुक्याच्या गोवनकोप्प गावात शनिवारी सकाळी घडली. मृत महिलेची ओळख शिवक्का बसवराज जोढळी (३३) अशी पटली आहे. आरोपी बसवराजने तिच्याशी प्रेमापोटी लग्न केले होते आणि या जोडप्याला सौम्या, प्रवीण आणि प्रभू अशी तीन मुले होती. असे सांगितले …
Read More »श्रीक्षेत्र स्तवनिधीमध्ये भक्तीमय वातावरणात ब्रह्मदेव पालखी सोहळा
निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील क्षेत्रपाल ब्रह्मदेव देवाचा अमावस्या आणि पाडव्यानिमित्त पालखी सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर निपाणी व परिसरातील भाविकांनी क्षेत्रपालाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी क्षेत्रपालाची पूजा व अभिषेक प्रतिष्ठाचार्य अनिल कुमार कलाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत म पार पडला. …
Read More »बंधुभाव, एकतेचा संदेश देत निपाणी परिसरात रमजान ईद साजरी
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील इदगाह परिसरात अंजुमन कमिटी आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदचा सण शनिवारी (ता.२१) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता ईदगाह परिसरात सामूहिक नमाज पठण करून अल्लाहची प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta