Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

भातकांडे शाळेसमोरील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

  बेळगाव : शहरातील भातकांडे स्कूल रस्ता दुरुस्तीच्या कामास अखेर बुधवारी प्रारंभ झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या या मार्गाला अखेर दिलासा मिळाल्याने व्यापारी, वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. भातकांडे शाळेसमोरील या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. व्यापारी व्यवहारांसाठी चारचाकी …

Read More »

मराठी शाळा कंग्राळी खुर्दच्या शताब्दी महोत्सवात 1981-88 बॅचची विक्रमी देणगी

  बेळगाव : मराठी शाळा, कंग्राळी खुर्द (ता. व जि. बेळगाव) शतक महोत्सवी सोहळ्याला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० व ३१ मे रोजी संपन्न झालेला हा सोहळा “न भूतो न भविष्यति” असा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या 1981 ते 1988 या बॅचमधील सुमारे 53 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी …

Read More »

जलवाहिनी गळतीचा फटका; बेळगावच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प

  बेळगाव : राणी चन्नम्मा चौक परिसरातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने शहरातील अनेक भागांचा बुधवारी (दि. ३) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गळती दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आल्याने संबंधित भागांमध्ये नियोजित पाणीवाटप करता आले नाही. याची नोंद घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासन आणि एल अँड टी …

Read More »

कागवाडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

  कागवाड : कागवाड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पहिली घटना कागवाड-शेडबाळ मार्गावरील उप्पारवाडी गावाजवळ घडली. शेडबाळहून कागवाडकडे जात असलेल्या दुचाकीची समोरच्या दिशेने जात असलेल्या मारुती स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात महाराष्ट्रातील …

Read More »

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीयांचे प्राण आहेत : डॉ. शेवडे

  बेळगाव : रामकथा ब्रम्हांड भेदून न्यावी, हे समर्थांचे म्हणणे शब्दशः सत्य ठरले आहे. आज जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांमधून रामकथेचा अनुवाद झालेला आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीयांचे प्राण आहेत. रामकथा अनेकांनी रचली. वाल्मिकी हे रामांना समकालीन असल्यामुळे त्यांनी लिहिलेले रामायण हे अधिकृत असल्याचे मानले जाते. भारतातल्या बहुतेक प्रमुख भाषांमध्ये …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीसाठी कौशल्याधारीत शिक्षण आवश्यक

  कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभा निपाणी (वार्ता) : सध्याचे शिक्षण पूर्वीच्या शिक्षणापेक्षा खूप वेगळे असून जग वेगाने पुढे जात आहे आणि त्यामुळे, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तके आणि परीक्षांपेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांना विचार करायला, समस्या सोडवायला, संवाद साधायला, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कौशल्य-आधारित शिक्षण हे गरजेचे असल्याचे मत …

Read More »

हजगोळी (चाळोबा टेकडी) परिसरात पर्यटकांना बंदी

  ग्रामसभेचा निर्णय; वाढते गैरप्रकार, अस्वच्छता आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर कठोर पाऊल बेळगाव : बेळगाव शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा टेकडी परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यातून होणारे गैरप्रकार, ग्रामस्थांना होणारा त्रास तसेच वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेऊन ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महेश फाउंडेशनकडून स्कूल बॅगचे वाटप

  बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम महेश फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करून संस्थेने शिक्षणप्रेमी सामाजिक बांधिलकी जपली. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच शैक्षणिक साहित्याच्या खर्चामुळे पालकांवर येणारा आर्थिक ताण काही …

Read More »

सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात

  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2026 -27 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव अनोख्या पद्धतीने, बैलगाडीतून सरस्वती मातेचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. पारंपारिक ढोल आणि झांज पथकाच्या गजरात नूतन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली. …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात

  बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. कोणी पोलीस, कोणी सैनिक, डॉक्टर, शिक्षक त्याचबरोबर शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विविध पारंपारिक वेशात इयत्ता पहिलीचे विद्यार्थी …

Read More »