Monday , September 21 2026
Breaking News

पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना ब्रह्मचैतन्य रुग्णसेवा फाउंडेशनकडून अन्नपदार्थ व औषध किटचे वाटप

Spread the love

 

हिंडलगा : श्री ब्रह्मचैतन्य रुग्णसेवा फाउंडेशन, हिंडलगा आणि फॉरनेस जनरिक मेडिसिन, विजयनगर (हिंडलगा) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल-रुक्मिणी वारकरी संस्था, मुळगाव (डिचोली, गोवा) येथून पंढरपूरकडे पायी दिंडीने निघालेल्या वारकरी भक्तांसाठी अन्नपदार्थ व औषध किटचे वितरण करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. थाबाजी रा. शिंदे व उपाध्यक्षा सौ. संगीता विवेकानंद शिंदे यांच्या हस्ते वारकऱ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सौ. ज्योती प. साळुंखे, सौ. राजश्री हसबे, सौ. रेखा मारुती पावशे तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव व खजिनदार यांनी वारकरी बांधवांना पुढील पंढरपूर यात्रेसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या सुखरूप व मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी भक्तांनी कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *