Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरात १६ जुलै रोजी एसआयआर प्रशिक्षण शिबिर; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे मार्गदर्शन

Spread the love

 

खानापूर : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे गुरुवार, १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्टेशन रोडवरील टाऊन पंचायत हॉल, खानापूर येथे SIR प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराला डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर, माजी आमदार (खानापूर) तथा एआयसीसी सचिव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या नियोजनाबाबत ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज रायगड निवास येथे पार पडली.

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर SIR प्रक्रियेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे.

खानापूर ब्लॉक काँग्रेसने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *