Sunday , July 26 2026
Breaking News

रवळनाथ युनिक संस्थेचा विस्तार देशभर व्हावा

Spread the love

 

डॉ. ज्ञानेश्वर मुळे; रवळनाथची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा

निपाणी (वार्ता) : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या वित्तीय संस्थांचे पर्यावरण हे केवळ आर्थिक नसून ते राजकीय, सामाजिक स्वरुपाचे आहे. परंतू हे पर्यावरण संतुलित आहे असे नाही. तरी देखील प्रतिकूल परिस्थितीतून या संस्था उभ्या रहात असतात. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सने देखील स्पर्धा आणि संघर्षातून गेल्या ३० वर्षात केलेली प्रगती अद्वितीय आहे. सहकारातील अशा युनिक संस्थेचा देशभर विस्तार झाला पाहीजे, असे गौरवोद्‌गार संस्थेचे मानद बॅण्ड अॅम्बेसिडर माजी राजदूत व सचिव परराष्ट्र मंत्रालयातील डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी काढले.
गडहिंग्लज येथील गणेश सांस्कृतिक भवनात श्री. रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष. एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, उपाध्यक्ष डॉ. संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी, केवळ सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि हितचिंतकांचा विश्वास आणि पाठबळ, संचालक, सल्लागार व कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळेच संस्थेने ३० वर्षाच्या वाटचालीसह एकुण व्यवसायाचा १००० कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. यापुढेही सर्वांनी अशीच साथ द्यावी असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले १८ ज्येष्ठ सभासदांचा अमृतमहोत्सवी सत्कार रवळनाथ संस्था समुहातील १६० कर्मचाऱ्यांना हेल्मेट प्रदान केल्याबद्दल महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रद्धा निळपणकर यांचा रवळनाथ हौसिंग फायनान्स सेवक पतसंस्थेतर्फे तसेच गडहिंग्लज कला अकादमीचे प्रा. शिवाजी पाटील यांनी ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळविल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय ८ सेवानिवृत्त सभासद आणि दहावी, बारावी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या ९ पाल्यांचा तसेच जागतिक सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेत्या ५ विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. ज्ञानेश्वर मुळे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी रवळनाथ व काळभैरव प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने सभेची सुरुवात करण्यात आली. सीईओ डी. के. मायदेव यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. मागील सभेचा वृत्तांत बोर्ड सेक्रेटरी प्रज्ञा पाटील यांनी वाचला. अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन संचालक प्राचार्य डॉ. मनोहर पुजारी, नफा विभागणी वाचन संचालक प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी तर अंदाजपत्रक वाचन डॉ. आर. एस. निळपणकर यांनी केले. वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्विकृती व लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्तीसह वाचन संचालक सुशांत करोशे यांनी केले. वैधानिक लेखापरीक्षक नेमणूकीचा ठराव संचालिका मीना रिंगणे यांनी मांडला. नवीन शाखा विस्तार बाबतचा ठराव संचालक प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांनी मांडला. डी. के. मायदेव यांनी पोटनियम दुरुस्तीचे वाचन केले. यांनी मांडला. संचालिका राजश्री कोले यांनी आभार मानले.
सभेस संचालक, अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे (बेळगांव), प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे (निपाणी), प्राचार्य आर. बी. पाटील (नेसरी), प्रा. जनार्दन दळवी (आजरा), पुष्पा नेसरीकर (चंदगड), विजय हरगुडे (कोल्हापूर), मनोहर गुरबे (कुडाळ), प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर (सांगली), सुहास नाडगौडा (पुणे), प्राचार्य डॉ. शिवानंद चौगला (धारवाड), अॅड. जयपाल बोके (चिक्कोडी), प्रा. डॉ. डी. एन. काशिद (सांगोला) महावीर चौगुले, आदीसह सर्व शाखांचे सल्लागार, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *