Monday , September 21 2026
Breaking News

शहर, उपनगरातील पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरात सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय नळांना गढूळ पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालकमंत्र सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन आम्ही निपाणीकर मंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
निपाणी शहरास सहा ते सात दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत त्याची दखल घेऊन चर्चेला पाचरण केल्यानंतर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी
नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना बोलावून पाणी प्रश्नावर चर्चा घडवून आणली. आपण पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक विचार करून निपाणी शहराला दोन दिवसातून एकदा पाणी कसे देता येईल याचे आठ दिवसात नियोजन करून तसे कळविण्यात यावे अशी अशी सूचना केली. राजकुमार मिस्त्री यांनी १९८४ पासून आपण दोन किंवा तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे.आता आठ दिवसातून एकदा पाणी मिळते हे जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सध्या अमृत दोन योजनेतून जी पाईपलाईन जमिनीखालून घातली जात आहे. ती पाईपलाईन जमिनीखालून न घालता जमिनीवरून घालण्यात यावी, जेणेकरून पाण्याची गळती तात्काळ निदर्शनास येऊन त्याची दुरुस्ती तात्काळ केली जाईल. यासाठी प्रयत्न करायला हवा असल्याचे सांगितले. अस्लम शिकलगार यांनी यमगर्णी येथून जी पाईपलाईन घातले आहे. त्यामधून मे महिन्या अखेरपर्यंत नदीमध्ये पाणी असते. ते पाणी तलावामध्ये साठवणूक करून तलाव पूर्ण क्षमतेने भरून भरून ठेवून ते पाणी मे पासून पुढील काय काही महिन्यापर्यंत वापरता येईल. याशिवाय काळम्मावाडी धरणातून येणारे पाणी मे महीन्याच्या मध्यंतरी त्या वेळी सुध्दा तलाव भरुण घेतले तर पाऊस लांबला तरी त्या पाण्याचा पुढील काळात वापर करता येईल. सध्या असलेल्या ३५० एचपी मोटरची क्षमता वाढवून त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करून कायमस्वरूपी पाणी उचलता येईल. याकडे लक्ष दिले पाहिजे सध्या विज गेल्यानंतर पाणी उपसा बंद होतो. सध्या आहे तो जनरेटर बंद आहे. याबाबतही पालकमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली असून तशा सूचनाही देण्यात आल्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी सध्या असलेल्या जवाहरलाल तलावातील गाळ काढण्यासंदर्भातील माहिती पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी यरनाळ येथे नवीन तलाव बांधणी करून पाण्याचा साठवा केल्यास निपाणीकरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जारकीहोळी यांनी आम्ही निपाणीकर यांच्या शिष्टमंडळा नगरपालिका आयुक्तांना आठ दिवसात दोन दिवस आड पाणी कसे देता येईल आणि निपाणी करांचा पाणी प्रश्न कायमचा कसा सुटेल याचे नियोजन करून आराखडा देण्यास सांगितले. यावेळी ॲड. अविनाश कट्टी
प्रा. डॉ. एन. डी. जत्राटकर, प्रा. आर. के. दिवाकर, राजकुमार मेस्त्री, सुनील पोळ, अस्लम शिकलगार, गोपाळ नाईक, कबीर वराळे, अरुण आवळेकर यांच्यासह आम्ही निपाणीकर घटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *