

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जस्टीस फोरमतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी बी. एस. कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. राजेंद्र थरकर, रमेश जयकर, सुरेश कांबळे, अजित कांबळे, राजेंद्र भगवंत मधाळे, नास्तिक कांबळे, उदय वंटे, जनार्दन मोहिते, पी. एस. कांबळे, बेबी सावंत, लखन वर्धन उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रमेश जयकर यांनी स्वागत केले.
डॉ. शिवकुमार यांनी, विद्यार्थ्यांनी क्लास वन ऑफिसर बनण्याचे स्वप्न मनासी बाळगावी. दररोज सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. पहिल्या पिढीपासून चौथ्या पिढीपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पटलेले आहे. शाहू महाराजांनी शिक्षणाचा पाया रचून शिक्षणाला आरक्षण स्कॉलरशिप गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकारी केले. शिक्षण सर्वासाठी मोफत केल्याचे सांगितले.
ॲड.राजेंद्र थरकार, राजेंद्र मधाळे, रमेश जयकर, सुरेश कांबळे, अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उदय वंटे, ईश्वर सदलगे, निलेश काळे, कविता कांबळे, जयश्री सावंत, संजीव हिमकर, प्रकाश पूर्वे, अतुल भोसले, मनोहर हेगरे यांच्यासह जस्टीस फोरमचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. बी. एल. पुजारी, उत्तम माळगे यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन मोहिते यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta