Monday , September 21 2026
Breaking News

सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक देण्याची एसडीएमसीची मागणी

Spread the love

 

मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील एस डी एम सी सदस्यांनी आज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करावा तसेच शाळेतील इतर प्रलंबित अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.

यावेळी शाळेतील वाढती विद्यार्थीसंख्या, नव्याने सुरू झालेले LKG-UKG वर्ग तसेच इतर शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

निवेदन स्वीकारल्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात येईल व समस्यांवर योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी SDMC अध्यक्ष, सदस्य तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *