Sunday , July 26 2026
Breaking News

दोन वर्षांपासून बंद असलेला टेकाकडील चव्हाटा मंदिर शेतवडीचा रस्ता अखेर खुला

Spread the love

 

मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांना यश; शेतकरी वर्गात समाधान

कुद्रेमानी : कुद्रेमानी येथील टेकाकडील चव्हाटा मंदिराकडे जाणारा शेतवडीतील रस्ता गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांमधील वादामुळे बंद होता. अखेर दि. १२ जुलै २०२६ रोजी मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हा वाद मिटला आणि बंद पडलेला रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात रवी पाटील, बाळाराम कदम, सुरेश पाटील, धोंडिबा पाटील आणि परशराम काकतकर यांनी मध्यस्थी पंच म्हणून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून सामंजस्याचा मार्ग काढला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेत रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे दोन वर्षांपासून बंद असलेला मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करणे सुलभ झाले आहे.

यावेळी यशवंत महादेव गुरव, शिवाजी महादेव गुरव, रामचंद्र रवळू पाटील, प्रकाश यळळूरकर, राजेंद्र मष्णू पाटील, विष्णू गुरव, रवळू गुरव, अशोक पन्हाळकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

रस्ता खुला झाल्यामुळे भविष्यात परस्पर सामंजस्य आणि सहकार्याची भावना कायम ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *