Sunday , September 20 2026
Breaking News

रस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास

Spread the love

 

खासदार प्रियांका जारकिहोळी; निपाणीत रस्ता कामाचा प्रारंभ

निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघाचा रस्त्याच्या माध्यमातून विकास साधला जाईल. आवश्यक त्या गावातील प्रमुख मार्गावरील प्रमुख आणि संपर्क रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वच रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.जत्राट वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सोमनाथ मंदिर व केसरकर मळा लखनापूर मार्गाच्या रस्ता कामाच्या प्रारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. ९०० मीटर रस्ता कामासाठी खासदार जारकीहोळी यांच्या फंडातून १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रारंभीरस्ता कामाचे पूजन माजी नगराध्यक्षा माधुरी घस्ते आणि जीवन घस्ते दाम्पत्यांच्या झाल्यानंतर मशीनचे पूजन पु करून कुदळ मारून कामाचा प्रारंभ खासदार पजारकीहोळी यांच्या हस्ते झाला. खासदार जारकिहोळी म्हणाल्या,निपाणी मतदारसंघात रस्ता कामासह समुदाय भवन, मंदिरासह इतर कामासाठी यापूर्वी निधी मंजूर केला आहे. यापुढील काळातही मंदिर, रस्ते गटारी, सार्वजनिक कामे पाणीपुरवठा या बाबीसाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली.
चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या फंडातून झालेल्या विविध विकास कामाचा आढावा घेतला. माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी खासदार जारकीहोळी यांनी केसरकर मळा ओढ्याजवळ पुलाच्या कामासाठी भरीव असा २ कोटी ७५ लाखाचा निधी मंजूर केल्यामुळे हे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक १३ मध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या फंडातूनही अनेक कामे झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास राज्य काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील, वर्षा चव्हाण, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, अनिता पठाडे, सुजय पाटील, जीवन घस्ते,युवराज पोळ, प्रवीण हेगडे, रवींद्र श्रीखंडे, किसन दावणे, लोकेश घस्ते, रॉबिन दावणे, दत्ता नाईक, सुमन खवरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या
—.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *