

बेळगाव : बस्तवाड (हा) दिनांक 10/07/2026 रोजी मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये 17 व्या कै. सुवर्णाताई आर मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्यांचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विठ्ठल भावकाण्णा पाटील होते या कार्यक्रमाचे सर्वात मुलींच्या स्वागताने करण्यात आली त्यानंतर कै. सुवर्णाताई रामचंद्रराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांचे चिरंजीव श्री. किरण मोदगेकर व श्री. रमेश मोदगेकर यांनी केले आणि दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय खांडेकर यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्देशून प्रारंभी श्री. विजय खांडेकर यांनी माजी जिल्हा पंचायत सदस्य व मराठा मंडळ स्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष माननीय श्री. रामचंद्रराव मोदगेकर साहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी असे म्हटले की, 1996 पासून ते आजतागायत मोदगेकर साहेबांच्या या गावाविषयी व हायस्कूल विषयी फार आतुर असे नाते आहे कारण सध्याच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात मदत करणारी माणसे क्वचितच असतात पण गेल्या अनेक वर्षही हायस्कूलसाठी शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश दरवर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांना देत असतात तेव्हा या शाळेविषयी त्यांचे योगदान फार मोलाचे आहे.
प्रिया स्मृतिदिनानिमित्त उद्देशून व कै. सौ. सुवर्णाताई या माऊलीविषयी शाळेविषयी श्री. रमेशराव मोदगेकर, श्री. निंगाप्पा चौगुले, एसडीएमसी अध्यक्ष श्री. शिवाजीराव काकतकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. रामा मंगेश काकतकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल भावकाण्णा पाटील यांनी विचार मांडले. या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळाचे संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक श्री. परशराम लोहार, सौ. सायली गुरव, सौ. मुक्ता पाटील, श्री. प्रमोद पाटील, यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना उपाहार म्हणून शिरा व उपीट देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भावकाण्णा पाटील यांनी तर आभार श्री. परशराम लोहार यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta