Sunday , September 20 2026
Breaking News

पंचहमी योजना अंमलबजावणी समिती आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पंचायत हमी योजना अंमलबजावणी समितीची जुलै महिन्याची प्रगती आढावा बैठक तालुका पंचायत कार्यालयात पार पडली. बैठकीत विविध विकासकामे, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी होते.
यावेळी कमिटी तालुका अध्यक्ष रमेश जाधव यांनी, तालुक्यातील विविध विभागांच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा आणि निधीच्या योग्य वापराबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यात आला. विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अध्यक्षांनी यावेळी अधोरेखित केली.
याशिवाय विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत पुढील महिन्यापर्यंत निश्चित उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपस्थित सदस्यांनीही विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना मांडत बैठकीत सक्रिय सहभाग नोंदविला. बैठकीस पंचहमी कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *