निपाणी (वार्ता) : आठवडी बाजार, यात्रा, जत्रा बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण सोडून देतात. मात्र निपाणी ग्रामीण पोलिसांनी केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ पोर्टलच्या मदतीने तब्बल ४ लाख रुपये किमतीचे २१ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत …
Read More »“वार्ताचा इम्पॅक्ट’ शिरगुप्पी ओढ्यातील कचऱ्याची जेसीबीद्वारे स्वच्छता; तलावात येणाऱ्या पाण्याला करून दिली वाट
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. शिवाय सध्या पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून गाळ येत आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शिरगुप्पी ओढ्यातून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर टाकाऊ वस्तु आणि झाडे झुडपे उगवली आहेत. पाऊस …
Read More »बेळगावमध्ये कार अडवून दरोडा; कट रचणाऱ्या मित्रांसह आठ जण गजाआड
बेळगाव : गोव्याला जाणाऱ्या सुवर्ण कारागिरांची कार अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोकड, वाहने, शस्त्रे आणि इतर साहित्य असा एकूण 40.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार …
Read More »कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज; डी. के. शिवकुमार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
बंगळुरू : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना वेग आला असून कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज (शनिवार) सायंकाळी ४ वाजता विधानसौध येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून औपचारिक निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल गेहलोत यांनी …
Read More »अर्धवट कामामुळे मानकापूरमध्ये अपघातांच्या संख्येत वाढ; ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील इचलकरंजी- हुपरी मार्गावरील माणकापूर बसस्थानक समोरच्या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाच्या प्रमाणात वाढ होत आहे. सदर बसस्थानक समोरच्या रस्त्यालगतच गेल्या दोन- अडीच महिन्यापासून गावातील गटारीच्या सांडपाणी निवारणासाठी चर खुदाई करून निघालेल्या मातीचे ढिगारे रस्त्यावरच टाकलेले आहेत. त्यामुळे सदर रस्ता अरुंद बनला असून या ठिकाणी वरचेवर वाहनांची …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे वतीने हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्याचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, १ जून कन्नड शक्ती विरोधात धारातीर्थी पडलेल्या हुतात्माना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच कन्नड सक्तीवरुन जी दडपशाही …
Read More »यडोगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची पहिली बैठक उत्साहात
खानापूर : खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे यडोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बैठकीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला. खानापूर तालुक्यातील विविध गावांतील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे …
Read More »निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी
निपाणी (वार्ता) : आगामी निपाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे आवाहन फोर- जे- आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. बैठकीतील माहिती अशी, निपाणी नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत निवडणुका शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. येणाऱ्या …
Read More »पेरणी हंगामात खत-बियाण्यांच्या तुटवड्यावर शेतकरी आक्रमक; काळाबाजार रोखण्याची मागणी
बेळगाव : पेरणीच्या तोंडावर बी-बियाणे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, युरियासह विविध खतांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीसी) यांना निवेदन सादर केले. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, अनेक ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसून काही विक्रेते …
Read More »संवाद कौशल्य, आधुनिक तांत्रिक शिक्षणावर युवकांनी भर द्यावा
मीनाक्षी पाटील ;अरिहंत ग्रुपतर्फे रोजगार मेळावा निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे युवकांनी संगणक ज्ञान, संवाद कौशल्य आणि आधुनिक तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta