Monday , September 21 2026
Breaking News

संवाद कौशल्य, आधुनिक तांत्रिक शिक्षणावर युवकांनी भर द्यावा

Spread the love

 

मीनाक्षी पाटील ;अरिहंत ग्रुपतर्फे रोजगार मेळावा

निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे युवकांनी संगणक ज्ञान, संवाद कौशल्य आणि आधुनिक तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत मीनाक्षी पाटील यांनी केले. बोरगाव येथे आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या, निपाणी व परिसरातील बेरोजगार युवकांन रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने सात वर्षांपासून रोजगार मेळावा भरविण्यात येत आहे. येथे केवळ पदवी देत नसून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध केल्या जात आहेत. शाळेचे अध्यक्ष उत्तम पाटील व कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी युवकांसाठी विविध शिबिरे रोजगार मेळाव्यांचे उपक्रम हाती घेत आहेत. अरिहंत उद्योग समूहाकडून अनेक हजारो युवकांना रोजगाराची संधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले
मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे विनयश्री पाटील यांनी सांगितले.
विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून युवकांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यात सुमारे २ हजारापेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदवून विविध कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अभय करोले, संचालिका युवराज पाटील, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, महादेव उलपे, अण्णासाहेब भोजकर, कृषी संघाचे सीईओ आर. टी. चौगुला, शिक्षण संस्थेचे सीईओ बाळासाहेब हावले, औद्योगिक केंद्राचे प्राचार्य व्ही. बी. शिरहट्टी, दयानंद सदलगे, विक्रम घाटगे यांच्यासह विविध कंपन्यांचे पदाधिकारी युवक, युवती उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *